आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ २ - सकाळी ११ वाजताची वेऴ़ इंडियन आँईलच्या अकोळनेर (ता. नगर) पेट्रोलियम डेपोतील धोक्याची सुचना देणारा सायरन अचानक वाजायला लागतो़. त्याबरोबर आग लागली, आग लागली असा आरडाओरडा सुरु होतो़. डेपोतील अधिकारी- कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांची एकच धावपळ उडते़ थोड्याच वेळात अग्निशामक दल, पोलीस यंत्रणा, रुग्णवाहिकेसह डॉक्टरांचे पथकही दाखल होते़ सर्वच यंत्रणा अथक परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळविते आणि संभाव्य मोठा अनर्थ टळल्याने सुटकेचा निश्वास सोडते.काही वेळेसाठी का होईना, पण काळजाचा ठोका चुकवायला लावणारे हे चित्तथरारक दृष्य अकोळनेर डेपोमध्ये पहावयास मिळाले. निमित्त होते फायर इमर्जन्सी ड्रीलचे. अचानक आगीची दुर्घटना घडल्यास डेपोत आग प्रतिबंधात्मक यंत्रणा किती सज्ज आहे, हे पाहण्यासाठी डेपोमध्ये या इमर्जन्सी ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे सहाय्यक संचालक एन. ए. देशमुख, उपसंचालक विलास घोगरे, इंडियन आॅईलचे वरिष्ठ डेपो प्रबंधक आर. जी. पानकर, उपप्रबंधक आर. एम. दळवी, आर. बी. शिर्के, सुरक्षा अधिकारी विकास पाबळे, प्रचालन अधिकारी राजकुमार कुमावत, प्रशांत गोदरा, भारत पेट्रोलियमचे श्री चिंतामणी, सरवणकर डॉ. शेळके आदी उपस्थित होते.
आग विझवण्यासाठी अकोळनेरमध्ये धावाधाव
By admin | Updated: April 2, 2017 13:09 IST