शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गाडीखाली चिरडून शेतकऱ्याचा खून

By सचिन धर्मापुरीकर | Updated: October 18, 2024 20:28 IST

पोलिसांत तक्रार करण्यासाठी जातो म्हणून आरोपीला आला राग.

सचिन धर्मापुरीकर, लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव (अहिल्यानगर) : शिविगाळ केल्याची पोलिसांत तक्रार देण्यासाठी मुलासह निघालेल्या शेतकऱ्याला कारखाली चिरडून खून केल्याची घटना, गुरूवारी सायंकाळी कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात घडली. याप्रकरणी रात्री दोन वाजता कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावसाहेब पुंजाबा गागरे (वय ५५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

गुरूवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारातून शेतीचे कामे आटोपून रावसाहेब गागरे, त्यांचा मुलगा प्रवीण व प्रशांत गागरे हे ट्रॅक्टरमधून घरी जात होते. त्यावेळी रस्त्यात अमोल बळीराम शिंदे (रा. धोत्रे, तालुका कोपरगाव) हा त्याच्या मित्रांसोबत रस्त्यावर दारू पीत बसला होता. त्यावेळी त्यांना प्रवीण गागरे म्हणाला, आमचा ट्रॅक्टर जाऊ द्या. त्याचा राग अमोल शिंदे याला आला. गागरे पिता-पूत्र तेथून निघून घरी गेले. त्यानंतर अमोल शिंदे याने रावसाहेब गागरे यांना फोन करून शिवीगाळ केली.

शिवीगाळ केल्यानंतर अमोल शिंदेविरूद्ध पोलिसांत तक्रार करण्यासाठी रावसाहेब गागरे व प्रवीण आणि त्याचा भाऊ प्रशांत रात्री आठच्या सुमारास मोटारसायकलवरून कोपरगावकडे निघाले. तेव्हा धोत्रे ते खोपडी रस्त्यावर अमोल बळीराम शिंदे याने एमएच १७ सीएच ९९१९ क्रमांकाच्या कारने गागरे यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. धडकेमुळे तिघेही खाली पडले. तेव्हा अमोल शिंदे याने रावसाहेब गागरे यांचे अंगावरून दोन-तीन वेळेस कार मागेपुढे करून रावसाहेब गागरे यांचा खून केला. यात प्रवीण व प्रशांत हे सुद्धा जखमी झाले. घटनेनंतर अमोल शिंदे पळून गेला.वरील आशयाची फिर्याद प्रवीण रावसाहेब गागरे (वय ३२) यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून अमोल शिंदे याचे विरूद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१), ३५२, ३५१ (२)(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी अमोल घाटी रूग्णालयात

गुरूवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अमोल शिंदे याचा शोध घेण्यासाठी तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, तेव्हा आरोपी अमोल शिंदे हा वैजापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक संदीप कोळी व पोलिस पथक वैजापूरला गेले. यावेळी अमोल शिंदे याच्याही डोक्यास मार लागल्याने त्यास पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रूग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. घाटी रूग्णालयात योग्य पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला असून डिस्चार्ज मिळताच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली. 

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगर