शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन कंपन्यांना कोट्यवधीचा ‘झटका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:14 IST

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातून आॅनलाईन कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांनी कोट्यवधी रूपयांच्या वस्तूंची आॅर्डर केली

अरुण वाघमोडेअहमदनगर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातून आॅनलाईन कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांनी कोट्यवधी रूपयांच्या वस्तूंची आॅर्डर केली मात्र ऐनवेळी याच ग्राहकांनी या वस्तू घेण्यास नकार दिल्याने आॅनलाईन कंपन्यांना नाईलाजास्तव हा माल परत बोलविण्याची नामुष्की ओढावली आहे. परिणामी कोट्यवधी रूपयांच्या विविध वस्तू कुरिअर कंपन्यांत पडून आहेत.ग्राहकांना आॅनलाईनच्या माध्यमातून विविध कंपन्यांच्या वस्तू पुरविणाऱ्या अनेक कंपन्या सध्या कार्यरत आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांत शहरातील शेकडो ग्राहकांनी आॅनलाईन कंपन्यांच्या माध्यमातून मोबाईल आणि इतर वस्तूंची आॅर्डर दिली. आॅर्डर दिल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांत या वस्तू ग्राहांच्या पत्यांवर कुरिअर कंपनीच्या माध्यमातून पोहोच झाली. या ग्राहकांनी मात्र या वस्तू घेण्यास नकार दिला. परिणामी हा सर्व माल कुरिअर कार्यालयात पडून आहे. शहरातील काही कुरिअर कार्यालयात तर हा माल ठेवण्यासाठीही जागा नाही. त्यामुळे सदर आॅनलाईन कंपन्यांनी ट्रक पाठवून हा माल परत नेण्यास सुरूवात केली आहे. डिलेवरी रिजेक्ट करणा-या ९९ टक्के ग्राहकांनी आॅनलाईनच्या माध्यमातून मोबाईल आॅर्डर केले होते. आॅर्डर देऊन डिलेवरी का रिजेक्ट केली जात आहे. या विषयाची शहरात चर्चा रंगली आहे.आॅनलाईन मार्केटमुळे व्यवसायिकांचे नुकसानदिवाळीनिमित्त आॅनलाईन प्रॉडॅक्टस् सेल करणा-या कंपन्यांनी विविध आॅफर लॉन्च करत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक ग्राहक सध्या आॅनलाईन वस्तू खरेदी करण्यास पसंती देत आहेत. या आॅनलाईन मार्केटिंगमुळे स्थानिक व्यवसायावर परिणाम झाला आहे. आॅनलाईन वस्तू खरेदीत फसवणूक होण्याचाही धोका संभावतो.कुरिअर कंपन्यांची अडचणआॅनलाईनच्या माध्यमातून मागविलेला माल ग्राहक घेत नसल्याने कुरिअर कंपन्यांचीही अडचण झाली आहे. नाकारलेला माल जोपर्यंत कंपनी घेऊन जात नाही तोपर्यंत त्यांना कार्यालयात संभाळून ठेवावा लागत आहे. ग्राहकांच्या पत्यावर माल घेऊन जाणा-या डिलेवरी बॉयलाही यामुळे फुकट हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर