शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांना अखेर भरली धास्ती, धरपकड सुरू, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 21:25 IST

दुहेरी हत्याकांडानंतर केडगावमध्ये दगडफेक करणाºया शिवसैनिकांची अखेर महिनाभरानंतर धरपकड सुरू झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत पोलिसांच्या समोर उजळ माथ्याने फिरणारे शिवसैनिक बुधवारपासून शहरातून अचानक गायब झाले आहेत.

अहमदनगर : दुहेरी हत्याकांडानंतर केडगावमध्ये दगडफेक करणाºया शिवसैनिकांची अखेर महिनाभरानंतर धरपकड सुरू झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत पोलिसांच्या समोर उजळ माथ्याने फिरणारे शिवसैनिक बुधवारपासून शहरातून अचानक गायब झाले आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी नगरसेवक सचिन जाधवसह पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांना गुरूवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.केडगाव दगडफेकप्रकरणी पोलिसांनी ६०० शिवसैनिकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु गेल्या महिनाभरापासून पोलीस शिवसैनिकांना अटक करत नव्हते. त्यातच पोलिसांनी या गुन्'ातील कलम ३०८ (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) वगळले. त्यामुळे गुन्'ातील गांभीर्य आणखी कमी झाले. परिणामी दि. ७ मे रोजी नगरसेवक योगिराज गाडे यांच्यासह ९ शिवसैनिक स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांत हजर होऊन लगेच जामीन मिळेल अशी आशा शिवसैनिकांना होती. मात्र न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे इतर शिवसैनिकही धास्तावले.बुधवारी मात्र कोतवाली पोलिसांऐवजी एलसीबीच्या (स्थानिक गुन्हे शाखा) पथकाने शिवसैनिकांच्या धरपकडीसाठी विशेष मोहीम राबवली. त्यासाठी शहरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या टीम रवाना केल्या. त्यात नगरसेवक सचिन तुकाराम जाधव (वय ३८), दिपक सर्जेराव कावळे (२९), अशोक शामराव दहिफळे (वय ५७), रावसाहेब नारायण भाकरे (वय ४९), दीपक शंकरराव धेंड (वय ६१) अशा पाचजणांना ताब्यात घेण्यात आले. या सर्व आरोपींना कोतवाली पोलिसांकडे वर्ग करून गुरूवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.एकीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली असताना शिवसैनिकांबाबत घेतलेली मवाळ भूमिका शहरात चर्चेचा विषय ठरला. राष्ट्रवादीसह प्रसारमाध्यमांतूनही पोलिसांवर या संदर्भात टीका झाली. त्यानंतर मात्र शिवसैनिकांच्या धरपकड मोहिमेला गती आली. त्याचाच एक भाग म्हणून थेट एलसीबीने मैदानात उतरून शिवसैनिकांना ताब्यात घेतले. दुपारपर्यंत पाचजण सापडले. शिवसैनिकांना अटक होत असल्याची बातमी शहरात वेगाने पसरल्यानंतर मात्र बरेसचे शिवसैनिक शहरातून गायब झाले. एलसीबीेच्या टीम शिवसैनिकांच्या मागावर असून रात्रीतूनही काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे.गाडेंसह नऊजणांचा मुक्काम वाढलादरम्यान, सोमवारी अटक केलेल्या नगरसेवक योगिराज गाडे, रावजी नांगरे, प्रफुल्ल साळुंके, गिरीष शर्मा, सुनील वर्मा, अमोल येवले, अभिजित राऊत, दत्तात्रय नागापुरे, राजेश सातपुते या नऊ शिवसैनिकांची दोन दिवसांची पोलीस कोठडी बुधवारी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ केली. त्यामुळे त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडShiv Senaशिवसेना