नेवासा फाटा : छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत समोर भगवा झेंडा उभारून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक संजय वाघ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. मराठा सुकाणू समितीचे प्रदेश अध्यक्ष गणेश झगरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दिलीप महाराज बर्डे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्ता कांगुणे, अनिल लहारे, संदीप लहारे, उपसरपंच राहुल साळवे, भरत काळे, अजय कोळेकर, अनिल गोरे, अलका साळवे, जयश्री कोळेकर, उषा करांडे, गोरक्षनाथ बर्डे, अनिल साळवे, अशोक कांगुणे, अजित झगरे, सुनील साळवे, अशोक साळवे उपस्थित होते.
---
०७ मक्तापूर
060621\3108img_20210606_190431.jpg
नेवासा फाटा: नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथे शिवराज्याभिषेक दिन भगवा झेंडा उभारून साजरा..