शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

शिवसेनेचा जनाधार संपत चालला

By admin | Updated: October 4, 2016 00:46 IST

अहमदनगर : मी कधीही व्यक्तिगत पातळीवर टीका करत नाही. मात्र, शिवसेनेचा जनाधार संपत चालल्याने व्यक्तिगत पातळीवर टीका सुरू आहे.

अहमदनगर : मी कधीही व्यक्तिगत पातळीवर टीका करत नाही. मात्र, शिवसेनेचा जनाधार संपत चालल्याने व्यक्तिगत पातळीवर टीका सुरू आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात विखे ओसाड गावचे पाटील असा उल्लेख केला आहे. पण मला गाव तरी आहे. सेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी त्यांचे गाव जाहीर करावे, असा पलटवार विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी नगरमध्ये केला. ‘सामना’ मध्ये सोमवारी प्रसिध्द झालेल्या अग्रलेखात विखे यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका आहे. त्याला येथील पत्र परिषदेत उत्तर देताना विखे म्हणाले, शिवसेनेकडून सुरू असलेल्या व्यक्तिगत टिकेवरून त्यांच्या नेतृत्वाची पातळी दिसून येत आहे. त्यांनी मला गांडूळ संबोधले, पण गांडूळ शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेळ्या-बकऱ्या वाटणे म्हणजे शेती असा समज असणारे ठाकरे आता मुक्ताफळे उधळीत आहेत. मी ओसाड गावचा पाटील म्हणणाऱ्या ठाकरेंनी त्यांचे गाव जाहीर करावे, असे थेट आव्हान विखेंनी दिले. स्वत:ला शेष नाग म्हणून घेणारी सेना सत्तेत आल्यापासून लाचारी पत्कारून बिळात लपून बसली आहे. सेना शेष नाग नसून कालीया आहेत. माझ्या नावात कृष्ण असल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. दसरा मेळाव्याला शिवसैनिक पाठ फिरवतील, या भीतीपोटी माफिनामा व टीका नाट्य सुरू आहे. शिवसेना सत्तेत आल्यापासून बिळातील बांडगूळ असल्याची टीका विखे यांनी केली. (प्रतिनिधी)