शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीच्या मृत्यूप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा : शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 18:08 IST

महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांच्या गलथानपणामुळे पोलीस मुख्यालयात विजेच्या धक्क्याने तरुणीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी संबंधित अधिकारी कर्मचा-यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा,

अहमदनगर : महावितरण कंपनीच्या कर्मचा-यांच्या गलथानपणामुळे पोलीस मुख्यालयात विजेच्या धक्क्याने तरुणीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी संबंधित अधिकारी कर्मचा-यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, तसेच मयत तरुणीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिका-यांकडे केली आहे.शिवसेना उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, गिरीश जाधव, संभाजी कदम, संजय शेंडगे, संतोष गेनाप्पा, महेंद्र बिज्जा, सचिन शिंदे, सुरेश तिवारी,अमोल येवले, सुहास पाथरकर, अर्जुन बोरुडे, मंगलताई लोखंडे यांच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता यांची भेट घेवून निवेदन दिले.नगर शहरामध्ये पाऊस आणि वादळ याला सुरवात झाली आहे. आज नगर शहरात अशी परिस्थिती आहे कि नगर शहरात अनेक भागात वीजपुरवठा तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, वृद्ध लोकांचे अतोनात हाल होत आहेत. वीज बंद झाल्यावर वीज केव्हा येईल याची उत्तरे जनतेला मिळत नाहीत. मोबाईल किंवा फोन उचलत नाहीत व बंद करून निघून जातात. महावितरणची आपतकालीन व्यवस्था सुरु केली का नाही याची माहिती व फोन नंबर जनतेला मिळावे आणि आपतकालीन व्यवस्था १५ मिनिटात हजर रहावी. गुरुवारी(दि. १३) पोलीस मुख्यालयात विजेच्या धक्क्याने तरुणीच्या मृत्यूची दुदैर्वी घटना घडली होती याला जबाबदार महावितरण आहे. अनेक वेळेस तक्रार करूनसुध्दा ती दुरुस्ती न केल्यामुळे त्या मुलीचा मृत्यूझाला आहे. याला जबाबदार कोणते अधिकारी आहेत त्यांना तातडीने निलंबित करून त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरण