शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

भाजपकडून अवहेलना होऊनही शिवसेना सत्तेतच : बाळासाहेब थोरात यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 21:35 IST

जनतेला भूलथापा देऊन देशात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. गोरगरीब, शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात या सरकारचे धोरण आहे.

संगमनेर : शेतकरी क र्जमाफीनंतर राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मोठ्या जाहिरातबाजीनंतर कोणत्याही शेतक-याला कर्जमाफी मिळाली नाही. सत्ताधारी भाजपकडून सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची अवहेलना सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कायम जनतेच्या बरोबर राहण्याची भूमिका होती. मात्र, अनेकदा अवहेलना होऊनही शिवसेना सत्तेत असल्याची टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, जनतेला भूलथापा देऊन देशात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. गोरगरीब, शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात या सरकारचे धोरण आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कामकाजामुळे राज्यील विकासकामे रखडली आहेत. सरकारच्या मागील ३ वर्षांचे कामकाज बघता जनता त्यांच्या क ामकाजावर असमाधानी आहे. कोणतेही ठोस काम या काळात झाले नाही. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेतक-यांनी शेतात पिकविलेल्या सोयाबीनची खरेदी सरकारने केली नाही. कांदा व तूर या पिकांबाबत हीच परिस्थिती आहे. पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडले असून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे.सरकारची प्रशासनावर कोणतीही पकड नसल्याने मागील ३ वर्षांत शेतकºयांना कृषी पंपाची वीज बिलेही मिळाली नाहीत. पीक पाण्याचे दिवस आले असता कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याने शेतकºयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महानगरांमध्येही भारनियमन होत असून राज्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे.

१८२ उमेदवार निवडण्याची जबाबदारी

देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात निवडणुकीत आपल्याकडे १८२ उमेदवारांची निवड करण्याची जबाबदारी असून गुजरातमध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. भाजपने विकासाचे मॉडेल म्हणून गुजरातला पुढे केले, परंतु जीएसटी, नोटाबंदी, घसरलेला आर्थिक दर यामुळे आर्थिक मंदीसह व्यापार व प्रगती मंदावली आहे. भाजपविषयी जनतेत तीव्र नाराजी आहे. काँग्रेसला या निवडणुकीत नक्कीच मोठे यश मिळणार असल्याचा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

कन्हैय्या कुमार यांना व्यक्त होण्याचा अधिकार

कन्हैय्या कुमार यांना विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत विचार मंथन झालेच पाहिजे परंतु भाजपाकडून सर्वत्र मुस्काटबाजी केली जात असल्याची टिका आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातBJPभाजपाShiv Senaशिवसेना