शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बायोडिझेल तस्करीचा मास्टरमाईंड शिवसेनेचा शहरप्रमुख दिलीप सातपुते; सातपुते फरार, पोलिसांकडून चौफेर शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 13:27 IST

मास्टरमाइंड असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी सातपुते याचा आरोपी म्हणून समावेश केला असून त्याचा चौफेर शोध सुरू केला आहे. पोलीस तपासाची कुणकुण लागतात सातपुते नगर शहरातून पसार झाला. सातपुते याचे नाव समोर आल्याने या गुन्ह्यात सहभाग असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले असून त्यांनीही शहर सोडल्याची चर्चा आहे.

अहमदनगरहमदनगर: कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या बायोडिझेल तस्करीत शिवसेनेचा शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक दिलीप सातपुते याचे नाव समोर आले असून तोच या तस्करीचा मास्टरमाइंड असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी सातपुते याचा आरोपी म्हणून समावेश केला असून त्याचा चौफेर शोध सुरू केला आहे. पोलीस तपासाची कुणकुण लागतात सातपुते नगर शहरातून पसार झाला. सातपुते याचे नाव समोर आल्याने या गुन्ह्यात सहभाग असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले असून त्यांनीही शहर सोडल्याची चर्चा आहे.

22 ऑक्टोबर रोजी पहाटे पुरवठा विभाग व कोतवली पोलिसांनी केडगाव बायपास चौकात छापा टाकून बायोडिझेलवर कारवाई केली होती. यावेळी एकूण 52 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली आहे. बायोडिझेल तस्करीत राजकीय नेत्याचा हात असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून नगरमध्ये चर्चा होती. पोलिस मात्र कासव गतीने या गुन्ह्याचा तपास करत होते. बायोडिझेल तस्करीचे नगरचे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर अखेर कोतवाली पोलिसांना या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करावा लागला. या तस्करीत सातपुते याच्यासह आणखी कोणाचे नावे समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंधरा दिवसापूर्वी नगर-सोलापूर रोडवर छापा टाकून बायोडिझेल तस्करीचा पर्दाफाश केला होता. तेथील  तस्करीत मोठमोठ्या लोकांचा हात असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर