शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान
3
राजा रघुवंशी हत्याकांडावर सीमा हैदरच्या वकिलांचं मोठं विधान, म्हणाले - 'इस्लाम धर्मात...!'
4
सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींना भेट दिली दोन खास पुस्तकं, काय आहेत नावं?
5
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
6
Video: 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान दाखवले मोठे शौर्य; इंडिगोच्या विमानात BSF जवानाचा सन्मान
7
Covid Cases: कोरोना वाढतोय! पंतप्रधान मोदींना भेटण्याआधी मंत्री, नेत्यांना RT-PCR चाचणी सक्तीची
8
मुलाचा मृत्यू झाल्यावर वडिलांनी मृतदेहासोबत पुरली बाईक; मन हेलावून टाकणारी घटना
9
नारकरांच्या लेकाची गर्लफ्रेंडसोबत डेट, बांद्रामध्ये मारला फेरफटका; प्रेमाने तिला म्हणाला...
10
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
11
ऐरोली स्थानकाजवळ चायनीजच्या गाडीत सिलिंडरचा स्फोट, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर!
12
...तर प्रवाशांनी खच्चून भरलेली ट्रेन दगड, मातीत गाडली जाईल
13
५ मे रोजी लग्न, २५ ला हनिमून, २९ ला अपघात... बेपत्ता कपलचा गेल्या १३ दिवसांपासून शोध सुरू
14
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
15
Astrology: प्रेम होणे, प्रेमभंग होणे आणि प्रेमविवाह यशस्वी होणे याचेही पत्रिकेत विशिष्ट योग असतात!
16
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
17
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
18
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
19
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
20
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम

शिवसैनिकांनी हिवरगाव पावसा टोलनाका फोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 12:33 IST

हिवरगाव पावसा येथील टोलनाका शिवसैनिकांनी सोमवारी फोडला. एम. एच. १७ या पासिंगच्या चारचाकी वाहनांना टोलमुक्ती द्यावी, यासाठी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह शिवसैनिकांनी ही टोलफोड केली.

संगमनेर : पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेरनजिकचा हिवरगाव पावसा येथील टोलनाका शिवसैनिकांनी सोमवारी फोडला. एम. एच. १७ या पासिंगच्या चारचाकी वाहनांना टोलमुक्ती द्यावी, यासाठी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह शिवसैनिकांनी ही टोलफोड केली.

सोमवारी सकाळी शिवसैनिक मोठ्या संख्येने हिवरगाव पावसा येथील खेड-सिन्नर एक्प्रेस वे लिमिटेड कंपनीच्या टोलनाक्यावर आले. एम. एच. १७ पासिंग असलेल्या सर्व चारचाकी वाहनांना टोलमुक्त करावे, अशी मागणी करीत शिवसैनिकांनी टोल नाक्यावर आंदोलन केले. त्यानंतर शिवसैनिकांनी टोलनाक्याची तोडफोड सुरु केली. तसेच टोल व्यवस्थापनाकडून लावलेले बॅरेकेटस् तोडले व सर्व वाहनांसाठी रस्ता खुला केला. पोलिसांसमोरच शिवसैनिकांची ही टोलफोड सुरु होती. मात्र, पोलिसांनी कोणालाही मज्जाव केला नाही. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, संगमनेर तालुका प्रमुख जनार्दन आहेर, शहर प्रमुख अमर कतारी, अप्पासाहेब केतेकर, सोमनाथ कानकाटे, अशोक सातपुते आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरShiv SenaशिवसेनाSadashiv Lokhandeसदाशिव लोखंडे