शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

पाच लाख भाविकांचे शनिदर्शन

By admin | Updated: July 27, 2014 01:09 IST

सोनई : श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर येथे शनी अमावस्येनिमित्त पाच लाख भाविकांनी शनीदर्शन घेतले. शुक्रवार मध्यरात्रीनंतर १ वाजून ५७ मिनिटांनी अमावस्या प्रारंभ झाला.

सोनई : श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर येथे शनी अमावस्येनिमित्त पाच लाख भाविकांनी शनीदर्शन घेतले. शुक्रवार मध्यरात्रीनंतर १ वाजून ५७ मिनिटांनी अमावस्या प्रारंभ झाला. रात्रीपासूनच भाविक मिळेल त्या साधनाने शनीदर्शनासाठी येत होते. शनिवार दिवसभर पूर्ण अमावस्या असल्याने दिवसभर भाविकांची रीघ चालूच होती. शनिवारी पहाटे खा.चंद्रकांत खैरे, साखरे यांच्या हस्ते शनीआरती झाली. तर सायंकाळी डॉ. राहुल हेगडे यांच्या हस्ते शनी आरती झाली. केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांच्यासह उद्योगपती अरुण कुसळकर (चाकण), जयेश शहा (झिम्बॉवे) सोनी यांनीही शनीदर्शन घेतले.शनैश्वर देवस्थानमार्फत आरोग्य, पाणी, सीसीटीव्ही, वॉकी टॉकी, पाणी पुरवठा, मदत कक्ष, देणगी कक्ष उभारण्यात आलेले होते. देवस्थान अध्यक्ष शिवाजीराव दरंदले, कार्यकारी अधिकारी उदयकुमार बल्लाळ व विश्वस्त मंडळ भाविकांचे सोयीसुविधेसाठी प्रयत्नशील होते. एस.टी. महामंडळाचे वतीने यात्रा स्पेशल बसेस सोडण्यात आलेल्या होत्या. जीप, कार, लक्झरी, दुचाकी इ. मिळेल त्या साधनाने भाविक शिंगणापूरकडे येत होते. देवस्थानपासून दीड किलोमीटर अंतरावर वाहनतळ उभारण्यात आलेले होते. यात्रा स्थळीपूजा साहित्य, पानफुलं, प्रसाद, तेल, खेळणी, चहा, नाष्टा आदी स्टॉल उभारण्यात आलेले होते. देशभरातील विविध अन्नदात्यांनी भोजन, फराळ, नाष्टा, पाणी मोफत वाटप केले. (वार्ताहर)एजंटांचा सुळसुळाटपार्कींगजवळ चार चाकी, दुचाकी वाहने बाहेर थांबविण्यात येत होते. परंतु पार्कींगचे आतमध्ये अंदाजे १०० ते १२५ रिक्षा प्रत्येकी दहा रुपयेप्रमाणे पैसे घेऊन भाविकांना थेट जवळ आणून सोडत होते. पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत होते.