शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

शिर्डीत विखे सावध तर विरोधक आशावादी

By admin | Updated: June 9, 2014 00:02 IST

प्रमोद आहेर , शिर्डी लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने अन्य मतदारसंघांच्या तुलनेत शिर्डीत कमी पडझड झाली असली तरी विखे कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नाहीत़

प्रमोद आहेर , शिर्डीलोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने अन्य मतदारसंघांच्या तुलनेत शिर्डीत कमी पडझड झाली असली तरी विखे कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नाहीत़ विखेंनी डागडुजीसाठी कंबर कसली आहे, तर विरोधकही मोदी लाटेवर स्वार होण्यास सरसावले आहेत़शिर्डीत शिवसेनेकडून अभय शेळके निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत़ राष्ट्रवादीतून सेनेत आलेल्या शेळके यांनी गेल्या वर्षभरात मतदारसंघ पिंजून काढला आहे़ याशिवाय आक्रमक भाषणांमुळे मतदारसंघात परिचित असलेले सेनेचे तालुका प्रमुख कमलाकर कोते, तसेच कोल्हारचे शेखर बोऱ्हाडेही सेनेकडून नशीब आजमावू पाहत आहेत. मनसेकडून विजय काळे यांच्या नावाची चर्चा आहे़ विशेष म्हणजे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणेही शिर्डीत येण्याबाबत जोरदार चर्चा आहे़गेल्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील हे शिवसेनेचे डॉ़ राजेंद्र पिपाडा यांच्या विरोधात केवळ तेरा हजारांची आघाडी घेऊन विजयी झाले होते़ त्यावेळी शिर्डी व गणेश परिसर विरोधात गेला असतानाही प्रवरा परिसराने विखे यांना तारले होते. त्यानंतर विखे यांनी कृषी खात्याच्या माध्यमातून विविध विकासकामांचा धडाका लावला़ मात्र नगर-मनमाड रस्ता, बायपास, शिर्डीचा रखडलेला विकास, एफएसआय, एलो झोन वाढवण्याचा मुद्दा, रस्ते,शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्वच्छता, हॉटेल व्यवसायिकांचे प्रश्न, राहाता मॉडेल सिटी करण्याची घोषणा आदी प्रश्न आजही प्रलंबितच आहेत़ समाधी शताब्धी व कुंभमेळ्याच्या नियोजनाबद्दल अनास्था, संस्थानात व्यवस्थापन मंडळ नियुक्त होऊ शकले नाही, हे मुद्दे विरोधकांसाठी भांडवल ठरू शकतात.कृषिमंत्री विखे यांचे चिरंजीव डॉ़ सुजय विखे यांनी ग्रामीण भागात संपर्क वाढवून तरुणांची मोठी फळी उभी केली आहे़ त्याचा फायदा विखे यांना होणार आहे. सुजय विखे हे सहजी उपलब्ध होत असल्याने त्यांनी आपल्या संपर्कातून गावागावातील रस्ते, रोजगारासाठी प्रयत्न, तालुक्यात कृषी विभागाचे सर्वाधिक अनुदान व योजना जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम गेल्या विधानसभा निवडणुकीत मायनसमध्ये असलेले अस्तगाव, सावळेविहीरसारखी गावे मोदी लाटेतही प्लसमध्ये आली. ही नियोजनबद्ध कामांची पावती आहे़ शिर्डी व गणेश परिसरात मात्र विखेंना अद्याप सूर गवसलेला नाही़ भक्तसेवकांना ओळखपत्रे देऊन त्यांनी श्रीगणेशा केला आहे़ विखे यांनी गणेश कारखाना भागीदारी तत्वावर चालवण्याचा घेतलेला निर्णय ही जमेची बाजू आहे़ एकूणच मोदी लाट व काँग्रेस विरोधी वातावरणात विखेंना निवडणूक सोपी नाही, तसेच विखेंसारख्या मातब्बर नेत्याशी झुंज देणे विरोधकांनाही सोपे नाही़