संगमनेर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे हे सोमवारी (दि.८) सकाळी ११ वाजता अर्ज दाखल करणार आहेत.नगर शहरातील नेताजी सुभाष चौकातील शिवसेनेच्या शिवालय कार्यालयापासून भव्य रॅली काढून खासदार लोखंडे हे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख आमदार नरेंद्र दराडे यांनी दिली.पर्यावरण मंत्री रामदास कदम, विधानसभेचे उपसभापती विजय औटी, पालकमंत्री राम शिंदे, ग्रामविकास राज्यमंत्री दादाभाऊ भुसे, नगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, अनिल राठोड, शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, राजेंद्र झावरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, नितीन कापसे, सचिन तांबे, प्रकाश चित्ते, जालिंदर वाकचौरे, रावसाहेब डुबे, सुरेंद्र थोरात आदी उपस्थित राहणार आहेत.
शिर्डी : सदाशिव लोखंडे आज भरणार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:29 IST