शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत शासकीय पाण्याची चोरी : एकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 16:52 IST

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिर्डी नगरपंचायतीच्या साठवण तलावाला खासगी विहिरीतून आडवे बोअर मारुन पाणी चोरणाºयाचा प्रताप उघडकीस आला असून

शिर्डी : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिर्डी नगरपंचायतीच्या साठवण तलावाला खासगी विहिरीतून आडवे बोअर मारुन पाणी चोरणाºयाचा प्रताप उघडकीस आला असून, या पाणी चोराला नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे़ या पाणी चोरणाराच्या विरोधात शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे़या घटनेनंतर नगरपंचायतीने तलावाची बारकाईने तपासणी सुरू केली आहे. आणखी दोन विहिरीतून अशाच प्रकारे आडवे बोअर मारल्याचे समोर आले आहे़ या प्रकारामुळे नगरपंचायतीचा तलाव कोरडा पडला आहे. यामुळे शहरात संताप व्यक्त होत आहे़नगरपंचायतीने १९८३ साली हा तलाव बांधला़ नगरपंचायतीने काही वर्षापूर्वी कनकुरी रोडला आणखी एक तलाव बांधला असला तरी या तलावातून शहरातील काही भागाला पाणी पुरवठा केला जातो़ यावेळी साठवण तलाव नेहमीपेक्षा लवकर कोरडा झाल्याने नगरपंचायत कर्मचाºयांना संशय आला़ त्यांनी बारकाईने तपास केल्यानंतर तलावापासून जवळपास दीडशे फुटावर असलेल्या विठ्ठल तबाजी दाभाडे यांनी आपल्या विहिरीतून थेट तलावाच्या खालील भागात आडवे बोअर मारून होल पाडल्याचे लक्षात आल्याने अधिकारी चक्रावून गेले़याबाबत कर्मचाºयांनी मुख्याधिकारी सतीश दिघे यांना माहिती दिली असता त्यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करून तलावातील पाणी तस्करीबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले़ त्यानुसार नगरपंचायत कर्मचारी सर्जेराव कांबळे यांनी पोलिसात दाभाडे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली़ पोलिसांनी दाभाडे यांना अटक केली आहे़शिर्डी शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. खूप परिश्रमपूर्वक शहराची पाणी समस्या सोडवण्यात आली आहे़ त्यामुळे अशा घटना घडल्यास कठोर कारवाई करावी लागेल - सतीश दिघे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, शिर्डी.सार्वजनिक पाणी चोरीचा प्रकार धक्कादायक व निंदनीय आहे. त्या विरोधात कारवाई करणाºया प्रशासनाच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत़ -अर्चना कोते, नगराध्यक्ष, शिर्डी.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर