शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी मतदारसंघात लोकसंपर्कावर भर : भाऊसाहेब कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 16:52 IST

शिर्डी मतदारसंघात लोकसंपर्क रुजविण्याबरोबरच प्रत्येक तालुक्यात संपर्क कार्यालय सुरू करण्याचा संकल्प काँग्रेस उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केला आहे.

श्रीरामपूर : शिर्डी मतदारसंघात लोकसंपर्क रुजविण्याबरोबरच प्रत्येक तालुक्यात संपर्क कार्यालय सुरू करण्याचा संकल्प काँग्रेस उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केला आहे. नागरिकांना सहजासहजी उपलब्ध होणारा खासदार अशी ओळख निर्माण करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.गुरूवारी दत्तनगर, खंडाळा, राजुरी आदी गावांच्या प्रचार दौऱ्यात कांबळे यांनी ‘लोकमत’ शी दिलखुलास संवाद साधताना मतदारसंघाच्या विकासाविषयीच्या कल्पना मांडल्या. दहा वर्षे विधानसभा सदस्यत्वाच्या कार्यकाळात केलेली विकास कामे व निभावलेली भूमिका त्यांनी सांगितली.कांबळे म्हणाले, विरोधी उमेदवारांनी निवडून आल्यानंतर या मतदारसंघात मतदारांचे साधे आभारही मानले नाहीत. आजही अनेक लोक त्यांना ओळखत नाहीत. जनतेच्या सुख-दु:खात त्यांच्या अडीअडचणीच्या काळात लोकप्रतिनिधीला नेहमीच सहभागी व्हावे लागते.शिर्डी मतदारसंघ हा अत्यंत जागृत आहे. येथील लोकांच्या अनेक अपेक्षा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील. गेली दहा वर्षे श्रीरामपूरचा आमदार म्हणून काम पहात आहे.नगरसेवकापासून आपण राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. जनतेशी नेहमीच नाळ जोडलेली आहे. सकाळी सात वाजेपासून रात्री उशिरापर्यंत कोणत्याहीमाणसाला भेटण्यासाठी मी उपलब्ध राहतो.श्रीरामपुरातील मुख्य प्रशासकीय इमारत, ग्रामीण आरोग्य केंद्र, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारती आपण उभ्या केल्या. नगरपालिकेला निधी देण्यात नेहमीच मोकळा हात राहिला. देवळाली परिसरातील गावांच्या विकासातही निधी दिला.श्रीरामपूर मतदारसंघातील ८४ गावे व दोन नगरपालिकांचे कार्यक्षेत्र सांभाळत आलो आहे. राहुरी तालुक्यातील गावांवरही कधी अन्याय होऊ दिला नाही.सर्वांनाच निधी देण्याचे काम केले. हाच अनुभव लोकसभेसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास कांबळे यांनी व्यक्त केला.रोजगार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्यच्मतदारसंघातील पाणी प्रश्न, एमआयडीसीतील उद्योगांना चालना देण्याचा प्रश्न सोडविण्यावर माझा भर राहील. शेतकºयांच्या प्रश्नांप्रती अधिक गंभीर आहे. खासदार म्हणून माझ्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करील असे कांबळे म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019