शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी मतदारसंघ पाणीदार करणार : सदाशिव लोखंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 16:49 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने समन्यायी पाणी वाटप कायदा केला.

शिवाजी पवारश्रीरामपूर : काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने समन्यायी पाणी वाटप कायदा केला. त्यांच्याच पापामुळे मराठवाड्याला पाणी देण्याची वेळ आली आहे. घाटमाथ्यावरून समुद्राला वाहून जाणारे ६० टीएमसी पाणी प्रवरा व गोदावरी खोऱ्यात वळवून येथील पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पुढील पाच वर्षात प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुक्रवारी येथे झालेल्या सभेसाठी आले असता लोखंडे यांच्याशी ‘लोकमत’ ने संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे, अशोक थोरे हे उपस्थित होते. लोखंडे यांनी अनेक मुद्यांवर दिलखुलास संवाद साधला. विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. लोखंडे म्हणाले, आघाडी सरकारने जरी निळवंडे धरण पूर्णत्वाला नेले असले तरी तेवढे पुरेसे नाही. जोपर्यंत शेतात पाणी पोहोचत नाही, तोपर्यंत त्या कामाला काहीही अर्थ नाही. आपण केंद्र सरकारकडून धरणाला मंजुरी मिळवून देत कालव्याच्या कामांना चालना दिली. मतदारसंघातील पूर्वेकडील श्रीरामपूर, नेवासे, राहुरीच्या काही भागाच्या पाण्याचाही आपण विचार केला आहे. घाटमाथ्यावरचे पाणी वळविण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकारात्मक आहेत. हा प्रकल्प झाल्यास नगरसह मराठवाड्याचाही पाणी प्रश्न सुटणार आहे. मतदारसंघात आपण कृषी उत्पादक कंपन्या सुरू केल्या. त्यामुळे शेती उद्योगाला चांगले दिवस येतील. देशात शिर्डीसाठी या कंपन्या मंजूर करून आणल्या. ही संधी फार थोड्या खासदारांना मिळाली, असे लोखंडे म्हणाले.प्रत्येक तालुक्यात विकासाचा समतोल साधलाश्रीरामपुरच्या टपाल कार्यालयात नुकतेच पासपोर्ट कार्यालय सुरू केले. त्यामुळे येथील तरूणांना परदेशात जाता येणार आहे. देशात फार मोजक्याच ठिकाणी ही मंजुरी मिळाली आहे.विकास करताना मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याच्या विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे. पुढील पाच वर्षासाठी माझ्या चांगल्या योजना आहेत, असे ते म्हणाले.विरोधी उमेदवाराचा प्रशासनावर वचक नाही. त्यांच्याकडून कामे होत नाहीत. हे सर्व जनतेला माहीत आहे. माझ्याकडे कामाचा चांगला अनुभव आहे, असे लोखंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019