शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांवर उमेदवार आयातीची वेळ-राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 14:36 IST

पाच वर्षात केलेल्या विकास कामामुळे मतदारसंघात विरोधात उभे राहण्यासाठी एकही माणूस विरोधकांना मिळत नाही. त्यामुळे बाहेरचे लोक माझ्या विरोधात उभे करण्यासाठी आणवे लागत आहेत. उमेदवार आयात करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली, अशी टीका पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.

जामखेड : पाच वर्षात केलेल्या विकास कामामुळे मतदारसंघात विरोधात उभे राहण्यासाठी एकही माणूस विरोधकांना मिळत नाही. त्यामुळे बाहेरचे लोक माझ्या विरोधात उभे करण्यासाठी आणवे लागत आहेत. उमेदवार आयात करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली, अशी टीका पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.शुक्रवारी जामखेड येथे सरपंच परिषद महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय काशीद यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, काशिनाथ ओमासे, विलास मोरे, शिऊरचे सरपंच हनुमंत उतेकर, सावरगावचे काकासाहेब चव्हाण, बोर्लाचे कृष्णाराजे चव्हाण, आपटीचे नंदू गोरे, सातेफळचे गणेश लटके, रत्नापूरचे दादासाहेब वारे, धामणगावचे महारूद्र महारनवर, साकतचे सरपंच हरिभाऊ मुरुमकर, पाटोदाचे गफ्फार पठाण, नायगावचे भारत उगले, बांधखडकचे केशव वनवे, खांडवीचे डॉ. गणेश जगताप, अरणगावचे लहू शिंदे, नान्नजचे विद्या मोहळकर, राजुरीचे गणेश कोल्हे, धोंडपारगावचे सरपंच सुखदेव शिंदे, जवळाचे प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.शिंदे म्हणाले, मंत्रीपदाच्या पाच वर्षांच्या काळात कोट्यवधी रूपयांचा निधी आणला. त्यामुळे मतदारसंघातील जनता आता विकासाची फळे चाखू लागली आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण पाणी योजनेच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करत आहे. मतदारसंघातील विकासकामांसाठी आम्ही कोट्यवधी रूपयांचा निधी आणला. परंतु, जाहिरात केली नाही. विरोधक मात्र चॉकलेट गोळ्या वाटतात. त्यावर स्वत: चा फोटो छापतात, अशी कोपरखळी त्यांनी मारली.बारामतीकरांनी गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर त्रास दिला. त्यांचा बदला मी बारामतीकरांचे डिपॉझिट जप्त करायला लावून घेणार आहे, अशी टीका त्यांनी केली. यावेळी विठ्ठलराव राऊत, अ‍ॅड. प्रवीण सानप, गोरख घनवट, नगरसेवक महेश निमोणकर, राजेश वाव्हळ, बिभिषण धनवडे, संतोष गव्हाळे, भाजप शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, पांडुरंग उबाळे, मनोज कुलकर्णी, ज्ञानेश्वर झेंडे, प्रवीण चोरडिया, विलास मोरे, प्रा. अरुण वराट, डॉ. विठ्ठल राळेभात, अल्ताफ शेख, ईश्वर मुरुमकर, नागराज मुरुमकर, तुषार बोथरा, बाळासाहेब बोराटे, शरद कार्ले आदी उपस्थित होते.प्रास्ताविक अजय काशीद यांनी केले. पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे यांनी आभार मानले. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर