अहमदनगर : वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी राज्य शासनाने घेतलेल्या सीईटी परीक्षेत नगर जिल्ह्यात वैद्यकीयमधून अंकुर बन्सी शिंदे तर अभियांत्रिकीतून शिवानी हापसे प्रथम आली. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांकाच्या २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने ५ मे रोजी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा घेतली. राज्यातून सुमारे चार लाख, तर नगर जिल्ह्यातून २६ हजारांच्यावर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. बुधवारी (दि. १) या परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला. यात नगर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स, अॅण्ड सायन्स महाविद्यालयाचा अंकुर बन्शी शिंदे याने वैद्यकीयमधून १९४ गुण मिळवले. तो जिल्ह्यात प्रथम आल्याचे समजते. त्यापाठोपाठ ईरा फातेमा १९३ (महाराष्ट्र कॉलेज), अर्पित डुंगरवाल १८९ (महाराष्ट्र कॉलेज) यांनी यश मिळवले. अंकुर हा डॉ़ बन्सी शिंदे यांचा मुलगा आहे़अभियांत्रिकीतून रेसिडेन्सिअल महाविद्यालयाची शिवानी हापसे ही १८७ गुणांसह जिल्ह्यात अव्वल ठरली. त्यापाठोपाठ वृषाली कोठारी १८१ (रेसिडेन्शिअल कॉलेज), स्वप्नील बोरूडे १७९ यांनी उत्कृष्ट यश मिळवले. अंकुरला प्रा. सुभाष ठुबे, अविनाथ जाधव, संदीप घुमरे, रवींद्र काळे तर हापसे हिला प्रा. सुर्वे, विजय कारंडे आदींचे मार्गदर्शन लाभले.श्रीरामपूर येथील आदित्य संजय पुलाटे यानेही सीईटी परीक्षेत घवघवीत यश मिळविले असून, पी.सी.बी. ग्रुपमध्ये १९० गुण त्याने मिळविले आहेत़ राज्यातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाचे (अभिमत विद्यापीठे वगळता) सर्व जागांचे प्रवेश या परीक्षेतून होणार आहेत. (प्रतिनिधी)
सीईटीत शिंदे, हापसे जिल्ह्यात प्रथम
By admin | Updated: June 2, 2016 00:58 IST