शिक्षक भारतीच्या कार्यालयात शिक्षक आमदार कपिल पाटील व राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बैठक झाली. या बैठकीत भोयरे गांगर्डा (ता. पारनेर) येथील दत्त विद्यालयाचे शिक्षक सुदाम दळवी व जवखेड खालसा (ता. पाथर्डी) येथील कानिफनाथ विद्यालयाचे शिक्षक संतोष शेंदूरकर यांना नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष जगताप, राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे यांनी दिले. जगताप म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्ता संघटनेसाठी महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक शिक्षकाच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम केल्यामुळे आज शिक्षक भारती संघटनेचा महाराष्ट्रात लौकिक आहे. चांगल्या कार्यामुळे ते या पदापर्यंत पोहोचले आहेत.
या पदाच्या माध्यमातून आणखी चांगले काम करून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी दिली. या बैठकीस मोहमंद समी शेख, योगेश हराळे, जितेंद्र आरू, विजय कराळे, बाबासाहेब लोंढे, महेश पाडेकर, कैलास रहाणे, महादेव डोंगरे, किशोर डोंगरे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, संतोष देशमुख, महादेव कोठारे, राजेंद्र जाधव, सिकंदर शेख, प्रकाश मिंड, किसन सोनवणे, नानासाहेब काटे, मुकुंद आंचवले, विलास माने, शरद कारंडे, राजेंद्र हिरवे, विलास वाघमोडे, प्रकाश तनपुरे, अनिल लोहकरे, बबनराव गायकवाड, नवनाथ घोरपडे, कैलास जाधव, गोरखनाथ गव्हाणे, संजय भुसारी, शंकर भिवसने, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, महिला सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागरे, संध्या गावडे, अनघा सासवडकर, रेवन घंगाळे, जॉन सोनवणे, आदी उपस्थित होते. ----------
फोटो - २०सुदाम दळवी
२० संतोष शेंदूरकर