अहमदनगर: जिल्ह्यातील शेवगाव- पाथर्डी मतदारसंघात सर्वाधिक अतिसंवेदनशील व संवेदनशील मतदान केंद्र आहेत़ त्यामुळे या मतदारसंघात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून, हा मतदारसंघ निवडणूक आयोगाच्या हिटलिस्टवर असण्याची चिन्हे आहेत़ शिर्डी मतदारसंघात सात तर राहुरी मतदारसंघात सहा मतदान केंद्र अतिसंवदेनशील आहेत़विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येत आहे़ मतदानाची जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे़ मतदान प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी शहरासह जिल्ह्यातील मतदान केंद्रांचीही माहिती घेतली जात आहे़ बारा मतदारसंघात ३ हजार ५९७ मतदान केंद्र आहेत़ या मतदान केंद्रांचे सर्वेक्षण जिल्हा पोलीस व निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले़ मतदान केंद्राचा अभ्यास करून संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निवड करण्यात आली़ निवडणूक शाखेच्या अहवालानुसार बारा मतदारसंघात ४२ अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत़ तर संवदेनशील मतदान केंद्रांची संख्या ११ आहे़ या केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून, अतिरिक्त पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले़शेवगाव- पाथर्डी मतदारसंघात सर्वाधिक १२ अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत़ याच मतदारसंघात चार केंद्र संवेदनशील आहेत़ त्यामुळे या मतदारसंघावर विशेष लक्ष असणार आहे़ शिर्डीमध्ये ७ अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत़ याशिवाय राहुरी, नेवासा, पारनेर, कर्जत,अकोले, संगमनेर मतदारसंघात अतिसंवदेशील मतदान केंद्र आहेत़ या मतदान केंद्रांच्या परिसरातील घडमोडींचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे़ या मतदान केंद्रासाठी विशेष पथकाचीही नियुक्ती करण्यात येणार असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला जाणार आहे़ (प्रतिनिधी)
शेवगाव-पाथर्डी हिटलिस्टवर
By admin | Updated: October 6, 2014 23:56 IST