ऊस वाहतूक करणारे वाहन चालक उखडलेल्या रस्त्यावर दगड- माती टाकून कसेबसे वाहने बाहेर काढतात; परंतु रात्री- अपरात्री अनेकांना येथील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होतात. यामुळे सध्यातरी येथील पूल मृत्यूचा सापळा बनल्याचे चित्र दिसून येत आहे.
मराठवाड्याला जोडणारा शेवगाव- गेवराई मार्ग हा अत्यंत रहदारीचा आहे. केदारेश्वर, ज्ञानेश्वर, गंगामाई, मुळा, वृद्धेश्वर व मराठवाड्यातील जय भवानी, समर्थ आदी साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या डबल ट्राॅली ट्रॅक्टर, बैलगाडी, ट्रक आदी वाहनांची वर्दळ असते. या मार्गावरील मारुती वस्तीनजीकच्या काळा ओढ्यावरचा पूल जवळपास तीन महिन्यांपासून उद्ध्वस्त झालेला आहे. सध्या रोज याठिकाणी छोटे-मोठे अपघात घडतात. एक ना एक अवजड वाहन येथे बंद पडून वाहतूक ठप्प झालेले चित्र नित्याचे बनले आहे.
.....
काळा ओढ्यावरच्या पुलावरील खड्ड्यात दुचाकी आदळून माझा मागील आठवड्यात अपघात झाला. यात माझ्या पोटानजीक बरगड्यांना जबर मार लागल्याने शस्त्रक्रिया करावी लागली. नशीब बलवत्तर थोडक्यात बचावलो.
- सागर लाड, अपघातग्रस्त प्रवासी.
...
फोटो-०२बोधेगाव रोड
...
ओळी- शेवगाव- गेवराई मार्गावरील बोधेगाव येथील काळा ओढ्यावरच्या पुलाची झालेली दुरवस्था.