शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेट्टींना उसापेक्षा मंत्रिपदाची काळजी

By admin | Updated: November 28, 2014 01:15 IST

कोपरगाव : ऊस दराबाबत इशारे देऊन आंदोलन पुढे पुढे ढकलण्याचे काम सध्या खा़ राजू शेट्टी करीत आहेत़ मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे त्यांचा डोळा आहे़

कोपरगाव : ऊस दराबाबत इशारे देऊन आंदोलन पुढे पुढे ढकलण्याचे काम सध्या खा़ राजू शेट्टी करीत आहेत़ मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे त्यांचा डोळा आहे़ उसापेक्षा त्यांना मंत्रिपदाची काळजी असल्याने त्यांचे सध्या सरकारशी ब्लॅकमेलींग सुरू असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी कोपरगावात केला़ऊस दर हक्क संघर्ष यात्रेनिमित्त कोपरगावात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ गुरूवारी कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना, संजीवनी कारखाना व गणेश कारखान्यावर ही संघर्ष यात्रा गेली़ पुढे बोलताना रघुनाथदादा म्हणाले, राजू शेट्टी हे कारखानदारांनीच उभे केलेले भूत आहे़ एकाच भागात आंदोलनाची नौटंकी ते करतात़ त्यांची आंदोलने शेतकऱ्यांसाठी किंवा ऊस दरासाठी नसतात़ ते पूर्णपणे राजकारणी झाले आहेत़ सरकारला धमक्या देऊन ते स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत़ एफआरपीच २६०० रूपये आहे तर ते त्यापेक्षा कमी म्हणजे २२०० रूपये भाव घेतात़ तडजोडीचे राजकारण आता उघडे पडत आहे़ लबाड्या अनेक दिवस चालत नाहीत, असा टोला पाटील यांनी मारला. शेतकऱ्यांसाठी चळवळ आम्ही उभी केल्याचे सांगून रघुनाथदादा म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांना पैसे मिळवून देतो, शेट्टी मात्र आंदोलने करून गोळीबार घडवितात़ त्यात यांना काहीच होत नाही, मरतो शेतकरी, असा आरोपही रघुनाथदादांनी केला. यावेळी पाटील यांच्या समवेत क्रांतीसिंह नानापाटील ब्रिगेडचे शिवाजीनाना नांदखिले, शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कालिदास आपटे, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब पटारे, जिल्हाध्यक्ष अशोकराव पठारे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष बच्चू मोढवे, संपर्क प्रमुख शिवाजीराव जवरे, संजय गाडे, संजय जगताप, निलेश चांदगुडे, सचिन चौघुले, रूपेंद्र काले होते़ (प्रतिनिधी) उसाला प्रतीटन ३५०० रूपये दर मिळाला पाहिजे, ऊस तोडणी मजुरांना समान काम समान वेतन कायद्यानुसार हार्वेस्टर यंत्राइतकी ऊस तोडणी मजुरी मिळाली पाहिजे, तसेच सी़ रंगराजन समितीच्या शिफारशी मान्य केल्या पाहिजे, अशी भूमिका रघुनाथदादा पाटील यांनी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना, संजीवनी कारखाना व्यवस्थापनासमोर मांडली़ कारखानदारांनीही त्यांच्या मागणीला समर्थन असल्याचे जाहीर केले़