शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
3
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
4
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
5
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
6
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
7
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
8
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
9
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
10
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
11
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
12
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
13
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
14
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
15
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
16
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
17
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
18
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
19
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
20
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव पोलिसांकडून गावठी दारूचे अड्डे केले उद्धवस्त,१४८ दुचाकी जप्त : जुगार खेळणाºया १३ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 12:20 IST

शेवगाव : लॉकडाऊन काळात दुचाकीवरून रस्त्यावर विनाकारण फिरणाºयांच्या तब्बल ३८ मोटारसायकल जप्त करुन पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आल्या आहेत. १४८ दुचाकीस्वारांना मोटार वाहन कायद्यातर्गत दंडात्मक कारवाई करुन सुमारे तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गावठी दारुचे अड्डे उद्धवस्त करून पोलिसांनी संपूर्ण गावठी दारू नष्ट केली आहे. तोंडाला मास्क न लावणाºयांवर कठोर कारवाई केली आहे.

शेवगाव : लॉकडाऊन काळात दुचाकीवरून रस्त्यावर विनाकारण फिरणाºयांच्या तब्बल ३८ मोटारसायकल जप्त करुन पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आल्या आहेत. १४८ दुचाकीस्वारांना मोटार वाहन कायद्यातर्गत दंडात्मक कारवाई करुन सुमारे तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गावठी दारुचे अड्डे उद्धवस्त करून पोलिसांनी संपूर्ण गावठी दारू नष्ट केली आहे. तोंडाला मास्क न लावणाºयांवर कठोर कारवाई केली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेवगाव पोलिसांनी कंबर कसली असून गत महिन्यातील २२ मार्च पासून धडाकेबाज कारवाई केली आहे. शेवगाव शहरासह तालुक्यातील रांजणी, सोनविहीर, बोधेगाव, मुर्षदपूर , एरंडगाव, घोटण, सोनेसांगवी, चापडगाव आदी गावात देशी दारु विकणारे, हातभट्टी दारु तयार करुन विकणाºया २० आरोपींच्या विरोधात १७ गुन्हे दाखल करुन ९८ हजार ८२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तालुक्यातील निंबेनांदूर व अमरापूर येथे जुगार खेळणाºया १३ जणांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊन दरम्यान दुकाने सुरू ठेवल्या प्रकरणी १३ जणांच्या विरोधात ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेवगाव शहर, शहरटाकळी, बोधेगाव, अमरापूर, थाटे, शिंगोरी गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावता, विनाकारण फिरणाºया १७ जणांच्या विरोधात ६ गुन्हे दाखल झाले आहेत. शेवगाव शहर व बोधेगाव येथे नाकाबंदी दरम्यान रस्त्यावर विनाकारण फिरणाºयांच्या ३४ मोटारसायकली जप्त करुन पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या आहेत.  १४८ वाहन चालकांवर वाहन परवाना, वाहनाचे कागदपत्र न बाळगणे, हेल्मेट न घालणे आदी स्वरूपाच्या मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई करुन २९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शेवगाव-पैठण रोडवरील कहेर्टाकळी व शेवगाव- गेवराई रस्त्यावरील महारटाकळी येथे आंतरजिल्हा चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. शेवगाव शहरातील क्रांतीचौक, आंबेडकर चौक येथे नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी तालुक्यात सर्वत्र कारवाईचा धडाका सुरू केला असून यामुळे कोरोनाला नियंत्रित करण्यात यश येत आहे.