शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लाईक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून; खावी लागू शकते जेलची हवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST

अहमदनगर : दिवसेंदिवस सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हाॅट्सॲप या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बहुतांशीवेळा शांतता ...

अहमदनगर : दिवसेंदिवस सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हाॅट्सॲप या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बहुतांशीवेळा शांतता बिघडविणारी किंवा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जातात. अशा पोस्ट तपासून न पाहताच त्या लाईक, शेअर किंवा फॉरवर्ड केल्यास जेलची हवा खावी लागू शकते. काही विघ्नसंतोषी मुद्दामहून चुकीच्या पोस्ट टाकतात तर काहींकडून माहिती तंत्रज्ञान कायद्याबाबत असलेल्या अज्ञानातूनही गुन्हा घडतो.

काहीच कारण नसताना एखाद्या व्यक्तीची अथवा समूहाची भावना दुखविणारी पोस्ट टाकणे, महिलांबाबत अश्लील व्हिडिओ, मेसेज व्हायरल करणे, बदनामी करण्यासाठी बनावट प्राेफाईल बनविणे, फोटोंचे मॉर्फिंग करणे आदी प्रकार सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून वारंवार होतात. अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होतेच; मात्र या पोस्टला लाईक, शेअर आणि फॉरवर्ड करणारेही अनेकवेळा कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. फेसबुकच्या माध्यमातून बनावट प्राेफाईल तयार करणे, अश्लील कमेंट टाकणे, बदनामी करणे अशा स्वरुपाच्या तक्रारींचे सायबर पोलीस ठाण्यात प्रमाण वाढले आहे.

-------------------------

साेशल मीडियाचा वापर करा सांभाळून

बहुतांशी जण सोशल मीडियावर सक्रिय असतात. पण त्यांना याबाबत असलेले कायदे अथवा आधुनिक तंत्रज्ञाची माहिती नसते. अशावेळी त्यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक होते किंवा त्यांच्याकडून अनवधानाने गुन्हा घडतो. हे टाळण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

.....................

मुलींनो, डीपी सांभाळा

साेशल मीडियावर महिलांबाबत सर्वाधिक जास्त गुन्हे घडत आहेत. त्यामुळे महिलांनी हे माध्यम वापरताना दक्षता घ्यावी. महिलांनी फेसबुक, इंस्टाग्राम अथवा इतर माध्यमांवर स्वत:चे अथवा नातेवाईकांचे फोटो शेअर करणे टाळावे, अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, तसेच प्राेफाईल लॉक करून ठेवावी. व्हॉट्सॲपवर डीपी ठेवताना ‘ओन्ली माय कॉन्टॅक्ट’ या सेटिंगचा वापर करावा. जेणेकरून कुणीही आपला प्राेफाईल फोटो किंवा व्हॉट्सॲप डीपी कॉपी करणार नाही.

-------------------------

आततायीपणा ठरतो घातक

सोशल मीडियावर व्यक्त होताना भावनांना आवर घालावी. एखाद्या विषयावर मत व्यक्त करताना बहुतांशी जण पातळी सोडून व्यक्त होतात. हीच पोस्ट कुणाची तरी भावना दुखावणारी ठरते. अशावेळी पोलिसांकडून कारवाई होते.

-----------------------

कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणे अथवा अशा पोस्टला लाईक, शेअर, किंवा त्या फॉरवर्ड करणे हा गुन्हाच आहे. त्यामुळे सामाजिक शांतता बिघडविणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर कुणीही व्हायरल करू नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.

- नंदकुमार दुधाळ, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन