शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांविषयी अपशद्व वापरल्याने श्रीगोंद्याचा फौजदार निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 17:37 IST

कोसेगव्हाण येथे एका आरोपीस पकडण्यासाठी गेले असता श्रीगोंद्या पोलीस ठाण्याचे फौजदार महावीर जाधव यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी अपशब्द वापरल्याच्या प्रकरणाचे बुधवारी विधानसभेत पडसाद उमटले. त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाधव यांच्या निलंबनाची घोषणा केली.

श्रीगोंदा : कोसेगव्हाण येथे एका आरोपीस पकडण्यासाठी गेले असता श्रीगोंद्या पोलीस ठाण्याचे फौजदार महावीर जाधव यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी अपशब्द वापरल्याच्या प्रकरणाचे बुधवारी विधानसभेत पडसाद उमटले. त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाधव यांच्या निलंबनाची घोषणा केली.राष्ट्रवादीचे श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप व मुंबईचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतचा विषय विधिमंडळाच्या नागपूरमधील पावसाळी अधिवेनात विधानसभेत उपस्थित केला होता. आ. जगताप म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांच्याविषयी कारण नसताना श्रीगोंद्याचे फौजदार महावीर जाधव यांनी कोसेगव्हाण येथे माजी सरपंच भीमराव नलगे यांच्या वस्तीवर काही संशयित आरोपींना पकडण्यासाठी गेले होते. तेव्हा जाधव या जबाबदार अधिकाऱ्याने भुजबळ यांच्याविषयी अपशब्द वापरले. यासंदर्भात सोशल मीडियावर क्लिप व्हायरल झाली होती. तसेच याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. आंदोलनेही झाली. त्यानंतर या अधिकाºयावर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन निलंबनाची कारवाई करण्यात आली नाही, याकडे आ. जगताप यांनी लक्ष वेधले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा आक्रमकपणा पाहून विधानसभा अध्यक्ष बागडे फौजदार महावीर जाधव यांना सेवेतून निलंबित करण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी बाके वाजवून समाधान व्यक्त केले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा