शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी सांत्वनपर भेट घेतली अन् नागवडे माईंना अश्रू अनावर झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 15:55 IST

शिवाजीराव नागवडे यांनी काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना आयुष्यभर जोपासण्याचे काम केले आहे. त्यांना राज्य सहकारी साखर कारखानदारीचे

श्रीगोंदा - शिवाजीराव नागवडे यांनी काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना आयुष्यभर जोपासण्याचे काम केले आहे. त्यांना राज्य सहकारी साखर कारखानदारीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यांचे सर्वाशी सुसंवाद व विचारविनिमय केलेले काम आयुष्यभर स्मरणात राहील, असे उद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. शरद पवार हे नागवडे कुंटबीयांचे सांत्वन करण्यासाठी वांगदरी येथे आले, त्यावेळी ते बोलत होते.

पवार पुढे म्हणाले की, बापूंच्या अंगात जबरदस्त इच्छाशक्ती होती.  त्यामुळे रुग्णालयात जाईपर्यत त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला.  आजारपणातून बाहेर पडतील अशी आशा होती पण सर्व काही तुमच्या आमच्या हातात नसते. राजकारणात नेहमीच प्रामाणिकपणे साथ देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे मागील निवडणुकीत राहुल जगताप यांना संधी मिळाली. त्यांची पुढची पिढी व राजेंद्र नागवडे अनुराधा नागवडे हे चांगले काम करीत असून त्यांचा आधार तुटला आहे. आपणास बापूंनी दाखविलेल्या आदर्श मार्गाने जावे लागणार आहे. नागवडे कुंटबीयांचा आधार म्हणून कार्यकर्त्यांनी साथ देण्याची जबाबदारी पार पाडावी हीच बापूंना श्रध्दांजली ठरेल. यावेळी आ.मोनिका राजळे, आ.राहुल जगताप, माजी आमदार अशोक पवार, दादाभाऊ कळमकर राजेंद्र फाळके, आण्णासाहेब शेलार अरुण कडू,  दादाभाऊ कळमकर, तुकाराम दरेकर, भाऊसाहेब कचरे, हरिदास शिर्के प्रशांत दरेकर केशव मगर आबासाहेब जगताप उपस्थित होते. 

नागवडे माईंना अश्रू अनावर शरद पवार यांनी राजेंद्र नागवडे समवेत बापूंच्या धर्मपत्नी कौशल्यादेवी (माई) नागवडे यांची भेट घेतली, त्यावेळी माईंना अश्रू अनावर झाले.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAhmednagarअहमदनगर