शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्यानंतर कांदा निर्यातबंदी उठवण्याबाबत शरद पवार यांनी घेतली केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 14:13 IST

अहमदनगर: कांदा निर्यातबंदी उठवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवार यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन कांदा निर्यातबंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे, अशी माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली. 

 

अहमदनगर: कांदा निर्यातबंदी उठवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवार यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन कांदा निर्यातबंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे, अशी माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली. 

केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी (14 सप्टेंबर 2020) कांदा निर्यातीवर घातलेली बंदी हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे, अशी मागणीच पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे मंगळवारी केली. 

या निवेदनात आमदार लंके यांनी म्हटले आहे की, बंदीचा हा निर्णय शेतकरी हिताचा नाही. महाराष्ट्रात कांदा पीक हे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आहे. माझ्या संपूर्ण मतदारसंघात कांदा हे पीक शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा आर्थिक प्रगतीचे विषय आहे.   महाराष्ट्रातील शेतकरी आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत.  या सरकारला शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही. कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होतील. कांद्याचे भाव जेव्हा कोसळतात त्यावेळी केंद्र शासन कधी अनुदान देते का ? शेतकऱ्यावर कोरोनाचे मोठे संकट असताना कांदा साठवण करून ठेवणे हे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.  त्यात निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांवर कोरोनापेक्षा मोठे संकट आलेले आहे. कांदा उत्पादक शेतकरी भविष्यात केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून रस्ता लोक रास्ता रोको आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही

तसेच सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आंदोलन करणे योग्य होणार नाही.  त्यामुळे केंद्र शासनाने हा निर्णय मागे घ्यावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा.  तसेच माझ्या पारनेर- नगर विधानसभा मतदारसंघात कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणात असल्याने सोमवारी झालेल्या निर्णयामुळे बऱ्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधून आपण या निर्णयाबाबत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना सांगून लक्ष घालावे असे सांगितले आहे.  त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना आपण आशेचा किरण आहात.  या अनुषंगाने केंद्र सरकारचा निर्यात बंदीबाबत घेतलेला हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडावे , असे साकडे आमदार निलेश लंके यांनी पवार यांना दिलेल्या निवेदनात घातले आहे. 

शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन निर्यातबंदी उठवण्याबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांवरील संकट टळेल असा विश्वास आमदार लंके यांनी व्यक्त केला.

ReplyForward

 
टॅग्स :Ahmednagarअहमदनगरonionकांदा