तिसगाव : धामणगाव देवीचे (ता.पाथर्डी) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शालन अनिल जायभार यांची तर उपसरपंचपदी शिवाजी भाऊसाहेब काकडे यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी उद्धव जागोर यांच्या अध्यक्षतेखाली नूतन ग्रामपंचायत सदस्यांची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात झाली. प्रत्येक पदासाठी एकच अर्ज आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी बिनविरोधची घोषणा केली. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब मरकड, अभिनेते नवनाथ काकडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला. ज्योती अंकुश गिरी, सुवर्णा शिवाजी काकडे, आरती सुरेश काळे, विठ्ठल आदिनाथ कुटे आदी ग्रामपंचायत सदस्य हजर होते. ग्रामसेवक श्याम साळवे यांनी आभार मानले.