शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

शिवमंदिरावर कोरोनाची छाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 12:36 IST

ढवळगाव : श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव येथील श्रावणातील  नागपंचमी सणाला अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात होत असते. परंतु कोरोनाने थैमान घातल्यामुळे यंदा सप्ताहाच्या कार्यक्रमावरती गडद छाया पडली आहे. आषाढघन बरसून जातो आणि सुरुवात होते  श्रावणातील सरींना.  

ढवळगाव : श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव येथील श्रावणातील  नागपंचमी सणाला अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात होत असते. परंतु कोरोनाने थैमान घातल्यामुळे यंदा सप्ताहाच्या कार्यक्रमावरती गडद छाया पडली आहे.आषाढघन बरसून जातो आणि सुरुवात होते  श्रावणातील सरींना.  

 

श्रावणातील आल्हाददायक गारवा, वाºयावर डोलणारे हिरवे शिवार, खळखळणारे निर्झर, आकाशात मनमुराद विहार करणारे पाखरांचे थवे, हिरवाईने नटलेले डोंगर, कोवळे, चमकणारे ऊन, ऊन-सावलीचा खेळ, अवघा आसमंत आपल्या सुगंधाने दरवळविणारे आणि खुशीत डोलणारे फुलांचे ताटवे, वृक्षवेलींवरील तरारलेली पाने, नववधूगत हिरवा शालू नेसून नटलेली ही वसुंधरा निसगार्चं हे लोभस रूप, हा अनमोल नजराणा पाहून मन हरखून जाते.

निसर्ग सौंदर्याने नटलेला, पशुपक्षांच्या कूजनानेगजबजलेला, वेगवेगळ्या फुलांनी दरवळलेलाप्रत्येकाच्या मनात चैतन्याने, उत्साहाने सळसळणारा

मनाच्या गाभार्यात सण, उत्सव, संस्कृतीचे विविधरंगी अध्यात्मसुगंधात्मक सात्त्विक तोरण झळकावणारा असा हा श्रावण. प्रत्येक वर्षी येणारा, आपल्याला वाट पाहायला लावणारा, याही वर्षी आला पण एक वेगळेच करोनाचे संकट घेऊन.  आनंदाला भरती यावे असेच सण-उत्सव आणि भक्तिरसात न्हाऊन निघणारे 'अखंड हरिनाम सप्ताह' अशा प्रकारे अध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्वणी श्रावण महिन्यात पहायला मिळते पण यावर्षी सर्व काही थांबलेलं आहे कोरोनामुळे.

सामाजिक मेळावे, धार्मिक कार्यक्रम किर्तन, भजन, हरिपाठ सामुदायिक एकत्रित येऊन करावयाचे कार्यक्रम असे सर्वकाही करोनामुळे ठप्प झालेलं आहे. आत्ताच्या घडीला जी माणसं जीवन जगत आहेत त्यांनी या अगोदर असे भयंकर करोनाचे संकट कधीच पाहिलेले नव्हते.

  अनेक वर्षांची परंपरा थांबलेली आहे मंदिरे सुनी आहेत.जिथे हजारोंच्या उपस्थितीत कीर्तनाचे कार्यक्रम व्हायचे तिथे आज सर्व काही सुनं सुनं दिसत आहे. कसला उत्साह नाही की चैतन्य नाही. प्रत्येकाच्या चेहºयावर एक प्रकारची उदासीनता अन् भीती पाहायला मिळत आहे. यंदा करोनाच्या सावटाखाली अवघं जग आहे. पहिल्यासारखं केव्हा एकदा सुरळीत होईल आणि पुर्वीसारखे मुक्त जीवन जगायला मिळेल याचीच आपण सर्वजण वाट पाहत आहोत.नक्कीच असा दिवस लवकरात लवकर उगवेल आणि आपल्याला असणारी करोनाची धास्ती निघून जाईल आणि पूर्वीसारखेच जीवन सुरळीत सुरू होईल. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTempleमंदिर