शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये राहुरीजवळ स्कॉर्पिओचा भीषण अपघात, 8 ठार

By admin | Updated: May 26, 2017 22:11 IST

अहमदनगर - मनमाड महामार्गावर राहुरीजवळ झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर दोघांचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास घडला.

ऑनलाइन लोकमत

राहुरी, दि. 26 -  अहमदनगर - मनमाड महामार्गावर राहुरीजवळ झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले तर दोघांचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोल्हारकडून राहुरीकडे येणारी स्कॉर्पिओ गाडी महामार्गाच्या बाजूला असलेल्या  झाडावर आदळली. दुचाकीस्वाराला वाचविताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही स्कॉर्पिओ सरळ झाडावर आदळली. यात सहाजण जागीच ठार झाले. या अपघातात अरुण थोरात, महेश पवार, सुरेश खुळे, महेश कोळपे, नाथा डमाळे, सतीष शेळके, सचिन ढगे, सतीष गोसावी अशी अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

यातील सचिन ढगे हे राहुरी तालुक्यातील वरंवडी गावचे सरपंच आहेत. तर उर्वरित सर्व जण राहुरी तालुक्यातील वळण येथील रहिवासी आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की झाड मोडून पडले आणि गाडीने चार पलट्या घेतल्या. ही स्कॉर्पिओ नवीनच शोरुममधून घेतली होती. त्यावर पासिंग क्रमांक टाकण्यात आलेला नव्हता. या गाडीवर एमएच १६, पीसी १९२ असा शोरुमचा तात्पुरता क्रमांक टाकलेला होता.