शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पाळीव कुत्रे, मांजरांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी! नगरविकास विभागाचे स्थानिक नागरी संस्थांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 19:46 IST

अंत्यविधीसाठी ठराविक शुल्क आकारले जाणार!

प्रशांत शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर: राज्यात प्राणिमित्रांकडून कुत्रे, मांजर, पांढरे उंदीर, इतर गौवंशीय प्राणी, इत्यादी पाळीव प्राणी पाळले जातात. या प्राणांच्या मृत्यूनंतर खाडी, तलाव, मोकळ्या जागा, पाण्याचे डबके किंवा रस्त्यांवर फेकले जातात. यातून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामारे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायती यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे आदेश नगरविकास विभागाने राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यांना दिले आहेत.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २५ जुलै २०२३ रोजी राज्यातील पाळीव प्राणी कुत्रे, मांजरे, पांढरे उंदीर, इत्यादी प्राण्यांकरिता स्मशानभूमीची व्यवस्था करावी, असा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. काही संस्थांकडून मनुष्य स्मशानभूमीशेजारी राखीव जागेत, तर काही स्थानिक घनकचरा व्यवस्थापन केंद्राशेजारी राखीव जागेत पाळीव प्राण्यांचे अंत्यविधी केले जातात. स्मशानभूमीशेजारील जागेत पाळीव प्राण्याचे अंत्यविधी केल्यास धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असते.

प्राण्यांचा अंत्यविधी करताना योग्य दक्षता न घेतल्यास दुर्गंधी व आजार पसरण्याची शक्यता असते. शिवाय रिकाम्या जागेत इतर लोक मृत प्राणी फेकण्याची शक्यता असते. त्यामुळे शासनाने राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यांना आपल्या कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या जागेत पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

स्मशानभूमीला संरक्षक भिंत

प्राण्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या स्मशानभूमीला संरक्षक भिंत व सुरक्षा व्यवस्था असावी. मृत प्राण्यांचे अंत्यविधी करताना योग्य ती दक्षता घेण्यात यावी, यातून दुर्गंधी निर्माण होणार नाही, इतर आजार पसरणार नाहीत, याची दक्षता संबंधित संस्थांना घ्यावी लागणार आहे. तसेच मृत पाळीव प्राणी इतर ठिकाणी टाकले जाणार नाहीत, याचीही जबाबदारी संबंधित संस्थेवर असणार आहे. पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी नागरिकांकडून ठरावीक शुल्क आकारले जाणार आहे.

टॅग्स :dogकुत्रा