शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खराब मोबाईलची विक्री; कंपनीला दणका, ग्राहक मंचाचा निकाल

By शिवाजी पवार | Updated: June 14, 2023 13:27 IST

ग्राहकाला ३० हजार रुपये देण्याचे आदेश

शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील अमित अभय मुथ्था यांना खराब मोबाइलची विक्री केल्याप्रकरणी कंपनीला ३० हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत.

मुथ्था यांना मोबाइल किमतीचे पैसे तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळणार आहे. तक्रारदार मुथ्था यांनी २०१७ मध्ये एका कंपनीचा मोबाइल शहरातील एका विक्रेत्याकडून खरेदी केला होता. मात्र, मोबाइलमध्ये अनेक तांत्रिक समस्या सुरू झाल्या. मोबाइलमधील सीम कार्डला नेटवर्क मिळत नव्हते. तसेच मोबाइल गरम होत होता. विक्रेत्याकडे चौकशी केल्यानंतर तो दुरुस्तीसाठी पाठविण्यात आला. मात्र, तो दुरुस्त होऊ शकला नाही. कंपनीने मुथ्था यांना मोबाइलवर एक वर्ष मोफत सेवा द्यावयाची होती. मात्र, तरीही दुरुस्तीचे पैसे आकारण्यात आले. अखेर मुथ्था यांनी २०१८ मध्ये ग्राहक तक्रार निवारणकडे दाद मागितली. येथील विक्रेता तसेच नोएडास्थित कंपनीविरुद्ध मुथ्था यांनी आरोप केले.

आयोगाने तक्रारीची दखल घेत मुथ्था यांना मोबाइलचे १४ हजार ९९० रुपये परत देण्याचे आदेश कंपनीला बजावले. त्याचबरोबर त्यांना झालेल्या मानसिक त्रासासाठी दहा हजार रुपये कंपनीला द्यावयाचे आहेत. आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीसाठी ५ हजार रुपये खर्च झाल्याने ते पैसेही मुथ्था यांना देण्याचे आदेश पारित करण्यात आले. नादुरुस्त मोबाइलच्या तक्रारीवर नुकसानभरपाई देण्याचा आदेश मिळाल्याने मुथ्था यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या वतीने आयोगासमोर ॲड. किरण जऱ्हाड यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी