शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

केडगावचे स्मशान बनले सेल्फी पॉइंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:30 IST

स्मशानाचे नाव काढले तरी अनेकांचा भीतीने थरकाप सुटतो. स्मशानासमोरून जाण्याचीही हिंमत होत नाही. पण हेच स्मशान फोटोसेशन करण्यासाठी अनेक हौशींचे मुख्य आकर्षण ठरत आहे. केडगावमधील शांतिवन सध्या अशा हौशी फोटो काढून घेणाऱ्यांचे सेल्फी पॉइंट बनले आहे. सेल्फीचे वेड थेट आता स्मशानातच जाऊन पोहोचले आहे.

योगेश गुंड।केडगाव : स्मशानाचे नाव काढले तरी अनेकांचा भीतीने थरकाप सुटतो. स्मशानासमोरून जाण्याचीही हिंमत होत नाही. पण हेच स्मशान फोटोसेशन करण्यासाठी अनेक हौशींचे मुख्य आकर्षण ठरत आहे. केडगावमधील शांतिवन सध्या अशा हौशी फोटो काढून घेणाऱ्यांचे सेल्फी पॉइंट बनले आहे. सेल्फीचे वेड थेट आता स्मशानातच जाऊन पोहोचले आहे.तरुणांना भुरळ घालणारे आणि आवडणारे अनेक सेल्फी पॉइंट नगर परिसरात उपलब्ध आहेत. शहराभोवतालच्या ऐतिहासिक वास्तू यासाठी मुख्य आकर्षण ठरल्या. चांदबिबी महल, भुईकोट किल्ला परिसर हे तरुणांना आवडणारे सेल्फी पॉइंट आहेत. मात्र त्याच त्याच ठिकाणच्या फोटोसेशनचा तरुणांना कंटाळा आलेला दिसतो. यामुळेच अनेक तरुणांनी सेल्फीसाठी आपला मोर्चा आता केडगावमधील शांतीवनाकडे वळवला आहे. या शांतीवनातील गर्द हिरवी झाडी,चोहोबाजूंनी पसरलेली हिरवळ, हिरवी पाने, फुले, बसण्याचे ओटे या सर्व गोष्टी आता फोटोसेशनसाठी उपयोगात येऊ लागल्या आहे. काही ठिकाणी अमरधाम म्हणजे लोकांना नकोसे असलेले ठिकाण कारण तेथे बसण्यासाठी ठीक जागाही नसते. नाविलाजास्तव लोक अशा ठिकाणी बसून राहतात. अनेक गावांच्या स्मशानाची दुरवस्था पाहून मरणही वेदनादायी ठरावे अशी प्रतिक्रिया उमटली जाते. मात्र केडगावमधील शांतीवन याला अपवाद ठरावे.ग्रामपंचायत काळापासून या शांतीवनाची उभारणी करण्यात आली. मध्यंतरी त्याचे सुशोभिकरण करण्यात आले. शांतीवन नावाला शोभेल अशी शांतता आणि स्वच्छता हे येथील मुख्य वैशिष्ट्य आहे. येथील हिरवळ तर अनेकांना भुरळ घालते. यामुळेच सध्या कडाक्याच्या उन्हात शांत आणि थंड सावली असणाºया या शांतीवनात फोटोसेशन आणि सेल्फी काढून घेणाºयांची मोठी गर्दी होत आहे. त्यात तरुणांची गर्दी अफाट असते. येथे फोटो काढून घेण्यासाठी खास छायाचित्रकार बोलवण्यात येतात. हव्या त्या पोझ मध्ये फोटो काढून घेण्यासाठी सर्वांची चढाओढ लागलेली असते. सेल्फीच्या वेडापायी हे स्मशान सेल्फी पॉइंट बनले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर