शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेला जेसीबी वाळू तस्करांनी पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 13:06 IST

वाळू उपसा करणारा जेसीबी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी बुधवारी रात्री पकडला होता. गुरुवारी पहाटे अज्ञात चार वाळू तस्करांनी हा जेसीबी पळविला आहे.

टाकळी ढोकेश्वर : वाळू उपसा करणारा जेसीबी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी बुधवारी रात्री पकडला होता. हा जेसीबी टाकळी ढोकेश्वर येथील शासकीय विश्रामगृहात आणून लावला होता.  गुरुवारी पहाटे अज्ञात चार वाळू तस्करांनी हा जेसीबी पळविला आहे.पारनेर तालुक्यातील काळू  नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांना मिळाली होती. त्यानुसार वनकुटे येथील वाळू तस्कराकडून गेल्या वर्षापासून वाळू उपशासाठी वापरलेले जेसीबी बुधवारी रात्री तहसीलदार ज्योती देवरे यांनी पकडला. रात्री उशीर झाल्याने हा जेसीबी टाकळी ढोकेश्वर येथील शासकीय विश्रामगृहात रात्री १२ वाजता आणून लावला होता. परंतु गुरूवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास शासकीय विश्रामगृहाच्या गेटचे कुलूप तोडून चार अज्ञात वाळू तस्करांनी हा जेसीबी घेवून पलायन केले असल्याची माहिती समजली आहे. वाळू तस्करांनी हा जेसीबी पळविल्याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी दुजोरा दिला आहे. याबाबत जेसीबी मालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे तहसीलदार देवरे यांनी सांगितले.विश्रामगृहातील पेव्हिंग ब्लॉकचे नुकसान जेसीबी पळवून नेताना या विश्रामगृहातील फरशा व पेव्हिंग ब्लॉकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केअरटेकर शिंदे यांनी सांगितले. पारनेर तालुक्यातील मुळा, मांडओहोळ, काळू नदीपात्रात अवैध वाळू  उपसा विरोधात धडक कारवाई सुरू केली असताना वाळू तस्करांनी थेट कारवाईतील वाहने पळविल्याने महसूल व पोलीस प्रशासनाच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.