शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत आसामच्या भक्ताला गुन्हेगारी अन माणुसकीचेही दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:53 IST

साईदर्शनासाठी आसाम येथून आलेल्या साईभक्तास शहरातील वाढत्या गुन्हेगारी बरोबरच माणुसकीचेही दर्शन घडले. शंतनु विपूल हजारिका, जि.जोहार, आसाम हे ११ आॅगस्ट रोजी शिर्डीत साईदर्शनाला आले होते.  साईसंस्थानच्या भक्तनिवासात त्यांनी निवास केला.

शिर्डी : साईदर्शनासाठी आसाम येथून आलेल्या साईभक्तास शहरातील वाढत्या गुन्हेगारी बरोबरच माणुसकीचेही दर्शन घडले.शंतनु विपूल हजारिका, जि.जोहार, आसाम हे ११ आॅगस्ट रोजी शिर्डीत साईदर्शनाला आले होते.  साईसंस्थानच्या भक्तनिवासात त्यांनी निवास केला. याठिकाणी त्यांची बॅग व पैसे चोरीला गेले. संस्थानच्या काही कर्मचाऱ्यांनी पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला तर काहींनी तक्रार देऊन फायदा होणार नाही असे सांगितले. द्विधा मनस्थिती निर्माण झालेले हजारिका हताश झाले. त्यांनी अनेकांकडे मदतीची याचना केली. मात्र त्यांना फारसी मदत झाली नाही. शेवटी त्यांनी एका हॉटेलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तेथे त्यांची प्रकृती बिघडली. १८ आॅगष्ट रोजी रक्तदाब व शुगर अचानक वाढल्याने चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी साईनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी चार-पाच दिवसाच्या उपचारानंतर त्यास बरे वाटले. त्यांनी सर्व घडलेली हकीगत सांगितली. मला घरी जाण्यासाठी मदत करा, अशी विनवणी त्यांनी केली़ येथील सामाजिक कार्यकर्ते द्वारकामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष ताराचंद कोते तसेच सागर कोते, ऋषीकेश कोते यांच्यासह रुग्णालयातील वार्ड बॉय, परिचारिका यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी हताश झालेल्या भक्तास मदतीचा हात दिला. या भक्ताच्या कुटुंबियाशी संपर्क साधून घरी जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट तसेच खर्चासाठी पैसे दिले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी