संगमनेर तालुक्यात विविध कंपन्यांचे एकूण १४७ मोबाईल टॉवर्स आहेत. त्यापैकी १६ मोबाईल टॉवर्स सील करण्यात आले आहेत. महसूल मंडलातील मंडलाधिकारी, तलाठी यांच्या पथकाने ही कारवाई केली. ४३ लाख ७८ हजार ३९३ इतकी एकूण मोबाईल टाॅवर्सच्या कराची रक्कम आहे. तालुक्यातील सर्व मोबाईल टॉवर्स कंपनीच्या शाखा प्रबंधकांना डिसेंबर २०२० मध्ये दंडात्मक नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. या सर्वच मोबाईल टॉवर्सची रक्कम जीआरपीएस प्रणीलीद्वारे सात दिवसांच्या आत शासन जमा करावी, अन्यथा मोबाईल टॉवर सील करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नोटीसीत नमूद होते. त्यानुसार वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
आतापर्यंत १९ लाख ४० हजार ३२३ रुपयांचा दंड वसूल झाला आहे. ज्यांच्याकडून दंड वसूल झाला. त्या मोबाईल टॉवर्सचे सील काढण्यात आले. ६७ कंपन्यांनी महसूल विभागाकडे दंडाच्या रकमेचे धनादेश जमा केले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रकमा प्रलंबित असणारे खातेदारांकडून वसुली करण्यात येत आहे. महसूल वसुली शिल्लक असल्याने मोबाईल टॉवर्स सील करण्यात आले. वसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यात येणार आहे. असेही तहसीलदार निकम यांनी सांगितले.
.................
महसूल विभागाची दमछाक
कोरोनाचा कालावधी, अतिवृष्टी, बेमोसमी पाऊस अशी संकटे गेल्या वर्षात आली. संगमनेर तालुक्यात महसूल विभागाची ५६ टक्के वसुली बाकी आहे. ती दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उदिष्ट असून वसुलीचे काम करताना महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची चांगलीच दमछाक होणार आहे.
-----------
फोटो नेम : ०२मोबाईल टॉवर्स सील
ओळ : मोबाईल टॉवर सील करताना महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी.