शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमधील निंबोडी येथील शाळेची इमारत कोसळली, १६ विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 18:06 IST

नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पावसामुळे पडली असून, या शाळेत ३५ विद्यार्थी अडकले आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते. या दुर्घटनेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

अहमदनगर, दि. 28 - नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पावसामुळे पडली असून, या शाळेत ३५ विद्यार्थी अडकले आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते. या दुर्घटनेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.नगर तालुक्यातील निंबोडी येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेची इमारती जुनी झाली होती. सलग दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे या शाळेची इमारती कोसळली. त्यामुळे सुमारे ३५ विद्यार्थी शाळेत अडकले असल्याची माहिती जिल्हा परिषदेतून सांगण्यात आली. काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.  शाळा पडल्याची माहिती जिल्हा परिषदेत समजताच जिल्हा परिषदेत एकच धावपळ उडाली. जिल्हा परिषदेने तातडीने एक रुग्णवाहिका निंबोडीला रवाना केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, शिक्षणाधिकारी काटमोरे, आरोग्य अधिकारी नागरगोजे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, जखमी मुलांवर तेथेच प्राथमिक उपचार केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.