शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर तालुक्यातील वडगाव पानमधील शाळेत भरतेय दारूड्यांची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 17:22 IST

येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रात्रीच्या वेळेस दारू पिणाऱ्यांची शाळा भरू लागली आहे. त्यामुळे शाळेतील आवारात रात्रीच्या वेळी दारू पिऊन पडणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

वडगाव पान : येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात रात्रीच्या वेळेस दारू पिणाऱ्यांची शाळा भरू लागली आहे. त्यामुळे शाळेतील आवारात रात्रीच्या वेळी दारू पिऊन पडणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील गावठाण हद्दीत माळेगांव हवेली रस्त्यालगत जिल्हा परिषद परिषद प्राथमिक शाळा आहे. सध्या शाळेला सुट्टी असल्याने शाळेतील आवार हे दारू पिणाºयांसाठी सोयीचे व विश्रांतीचे ठिकाण बनले आहे. दररोज सायंकाळी सहाच्या नंतर येथील आवारात काही मद्यपी या आवारात येतात व मनसोक्त दारू पिऊन तेथील परिसरात पिऊन झोपताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून येथील परिसरात दारू पिऊन झिंगाट होणाºयांची संख्या वाढत चालली आहे. कधी कधी जास्तच चढली तर कपड्यांमध्येच नैसर्गिक विधी होऊन परिसर अस्वच्छ करून टाकतात. दारू उतरल्यावर ही मंडळी दुसºया दिवशी सकाळीच घरी निघून जातात.शाळेसारख्या पवित्र मंदिरात ज्ञानदानाचे पवित्र काम चालण्याऐवजी दारू पिऊन झिंगाट होणाºयांमुळे परिसराचे पावित्र्य भंग पावत आहे. शाळेस संरक्षक भिंत नसल्याने शाळेच्या आवारात घुसखोरी करीत दारू पिऊन घाण करणे सोपे झाले आहे. त्यामुळे परिसरात व शाळेच्या मागे दारूच्या बाटल्या नेहमीच निदर्शनास पडतात. दारू पिऊन घाण करणारांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर