शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापित गुरुजींना मिळाल्या अखेर शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 11:07 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांत विस्थापित झालेल्या गुरुजींना अखेर शाळा मिळाल्या आहेत. जिल्ह्यातील ५३१ शिक्षकांच्या बदलीचा आदेश मंगळवारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असून, बुधवारी शिक्षकांना तालुका मुख्यालयातून नियुक्तीचा आदेश दिला जाणार आहे. 

अहमदनगर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांत विस्थापित झालेल्या गुरुजींना अखेर शाळा मिळाल्या आहेत. जिल्ह्यातील ५३१ शिक्षकांच्या बदलीचा आदेश मंगळवारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असून, बुधवारी शिक्षकांना तालुका मुख्यालयातून नियुक्तीचा आदेश दिला जाणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरावरून आॅनलाईन बदल्या झाल्या आहेत. बदली प्रक्रियेत जिल्ह्यातील ६२० शिक्षकांना त्यांनी सुचविलेल्या शाळांपैकी एकही शाळा मिळाली नव्हती.  त्यांच्या बदलीचा स्वतंत्र आदेश शिक्षण विभागाने काढला असून, दोन दिवसांत शाळेवर हजर होण्याचा आदेश दिला आहे.  बदलीचा आदेश येण्यापूर्वी विस्थापित शिक्षकांनी बोगस शिक्षकांच्या बदल्या रद्द करून त्यांच्या जागा आम्हाला द्याव्यात, या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. विस्थापित शिक्षकांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. मुलाबाळांसह महिला शिक्षक मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी झाल्या होत्या. उपोषण दिवसभर सुरू होते़. उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवण्याच्या निर्णयापर्यंत शिक्षक आले होते. परंतु, सायंकाळी विस्थापितांच्या बदलीचा आदेश निघाल्याची चर्चा सुरू झाली. तशी उपोषणातील गर्दी ओसरली होती. रात्री आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्याची बातमी उपोषणकर्त्यांपर्यंत पोहोचली. त्यामुळे गुरुजी दुसºया दिवशी जिल्हा परिषदेकडे फिरकले नाहीत. राज्यस्तरावरून करण्यात आलेल्या आॅनलाईन बदलीबाबत जिल्ह्यातून ४८० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेने फेरतपासणी केली. त्यानुसार पाचशेहून अधिक शिक्षकांनी सादर केलेले पुरावे संशयास्पद असल्याचे आढळून आले़ त्यामुळे विस्थापित शिक्षकांच्या आंदोलनाला चांगलाच जोर आला होता़ बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होऊन जागा उपलब्ध होतील.  यातून उपलब्ध झालेल्या शाळा विस्थापितांना मिळतील, अशी आशा विस्थापितांना होती. मात्र शासनाने आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही. उलटपक्षी विस्थापितांच्या बदलीचा आदेश काढला. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद