शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बचत गट महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करतात : शालिनी विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 19:07 IST

महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट हे महत्वाचे साधन असून, बचत गटाच्या माध्यमातून महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देऊन कुटुंब प्रगती पथावर नेण्याचे महत्वाचे काम करतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी केले.

अहमदनगर : महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट हे महत्वाचे साधन असून, बचत गटाच्या माध्यमातून महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देऊन कुटुंब प्रगती पथावर नेण्याचे महत्वाचे काम करतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी केले.शहरातील तांबटकर मळा येथील मैदानावर राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण विकास विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साई ज्योती स्वयंसहाय्यता यात्रा - 2019 चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले, पंचायत समिती सभापती रामदास भोर, शरदराव झोडगे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, अनिल कराळे, राजेश परजणे, शिवाजीराव गाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परिक्षित यादव आदी यावेळी उपस्थित होते.विखे म्हणाल्या, महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे ही काळाची गरज बनली आहे. आजही ग्रामीण भागात कौटुंबिक अर्थव्यवस्थेत महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर त्या कुटूंबाच्या कौंटुबिक अर्थव्यवस्थेला मदत होते. बचत गटाच्या माध्यमातून आत्मविश्वास व आर्थिक स्थिरता मिळण्याचे महत्वाचे काम केले जाते. महिला बचतगटाचे कर्ज परत फेडीचे प्रमाण अत्यंत चांगले असून महिला आर्थिक नियोजनात महत्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगून आजही राज्यातील महिला टंचाईस्थितीतही सक्षमपणे उभ्या आहेत हेच बचतगट चळवळीचे महत्वाचे यश असल्याचे त्यांनी सांगितले. आजही शिर्डी व ग्रामीण भागात बचतगटाच्या माध्यमातून सेंद्रीय अगरबत्ती तयार करण्याचे महत्वाचे काम केले जात आहे.प्रदर्शन 14 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद