यावेळच्या सौभाग्य अलंकार महोत्सवाचे खास आकर्षण ठरत आहे ते म्हणजे नावीन्यपूर्ण सोन्याचे व हिऱ्यांचे दागिने. सौभाग्य अलंकार महोत्सवात पारंपरिक आणि ट्रेंडी डिझाइन्सच्या अनोख्या व आकर्षक मंगळसूत्रांचे कलेक्शन सादर करण्यात आले आहे.
यामध्ये ग्राहकांना खरेदीवर ११०० चांदीचे बार जिंकण्याची संधी उपलब्ध आहे. यामध्ये १५,९००रुपयांच्या पुढील खरेदीवर ११०० चांदीचे बार जिंकण्याची संधी उपलब्ध आहे. सोन्याच्या दागिने खरेदीवर १ व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर २ कूपन्स ग्राहकांना मिळणार आहेत. याचबरोबर आपल्या प्रियजनांसाठीसुद्धा रेफरन्स ऑफर्समधून चांदीचे बार जिंकण्याची संधी आहे. चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर या योजना लागू आहेत.
सौभाग्य अलंकार महोत्सवाचे आयोजन दि. २९ ऑगस्ट २०२१ पर्यंत करण्यात आले आहे. ही ऑफर शुद्ध चांदी, सोने बुलियन, वेढणी, कॉइन आदींच्या खरेदीकरिता लागू राहणार नाही. शासकीय नियम व शाखांच्या कामकाजाच्या वेळेनुसार या ऑफर उपलब्ध असतील. सौभाग्य अलंकार महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन व चांदीचे बार जिंका, असे आवाहन चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि.च्या वतीने संचालक सिद्धार्थ अतुल शहा यांनी केले आहे. (वा.प्र.)