शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सत्संगामुळे मनाला स्थिरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 10:03 IST

सत्संगामुळे मन हलके व स्थिर होते म्हणून सत्संगाला महत्व आहे. ज्यावेळी तुमचे मन अस्थिर झालेले असेल. अशावेळी धर्मस्थानात जावे. संत संगतीचा, त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा. सत्संगात भाग घ्यावा. मनाला स्थिरता लाभेल आणि नंतर तुम्हाला तुमच्या समस्या सोडविण्याचा मार्ग सापडू शकेल.

सन्मतीवाणी

सांसारिक जीवनात अनेक संकटे, समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येते. अशावेळी मन स्थिर व शांत ठेवण्याची गरज असते. मनावर एक प्रकारे समस्यांचा दबाव असतो. तो कमी करण्यासाठी सत्संगाची आवश्यकता असते. सत्संगामुळे मन हलके व स्थिर होते म्हणून सत्संगाला महत्व आहे. ज्यावेळी तुमचे मन अस्थिर झालेले असेल. अशावेळी धर्मस्थानात जावे. संत संगतीचा, त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा. सत्संगात भाग घ्यावा. मनाला स्थिरता लाभेल आणि नंतर तुम्हाला तुमच्या समस्या सोडविण्याचा मार्ग सापडू शकेल. आजकाल कुणावर विश्वास ठेवणे धोकेदायक आहे. कोण कधी धोका देईल हे सांगता येत नाही. अशावेळी आपण सावधगिरीने वागण्याची गरज आहे.राजकारणात कूटनीती असते. एकमेकाविरुध्द लढावे लागते. राजकारणातील नीती घरात प्रपंचात आणू नये. तशी कूटनीती संसारात आली तर घराची बरबादी होईल. सदगुरुंवर श्रध्दा व भक्तिभाव ठेवला तर मनाला स्थिरता लाभते. संकट दूर होण्यास मदत होते. पृथ्वीला पर्वत आणि सागराचा भार कधीही होत नाही. पृथ्वी आनंदाने हा भार सहन करते. घरातील गोपनीय गोष्टी जाहीरपणे उघड करु नका. सदगुरुंचे उपकार लक्षात ठेवा नाहीतर विश्वासघात होईल. महावीरांच्या जीवनगाथा ऐका. यामुळे जीवनात आत्मप्रकाशाची ज्योत प्रगट होते. तपश्चर्येचा मुखवटा लावू नका, श्रध्दापूर्वक तपसाधना करा. तपसाधनेशिवाय आत्मिक ज्ञानाची प्राप्ती होणार नाही.जीवनात जो चुका वारंवार करतो, त्या कबूल करत नाही. त्या माणसाला अहंमपणाची भावना येते. तो ताठर होतो.  तो ताठरपणा जीवनाचा घात करु शकतो. ताठरपणा सोडून नम्रतेने वागले पाहिजे. तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो. दुसºयांना रागावू नका, दुसºयांवर आपला राग दाखवू नका. रागामुळे चांगली कामे बिघडतात. दुसºयांच्या मनाला लागतील असे विषारी शब्द बोलू नका. रागावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करा.     - पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Jain Templeजैन मंदीर