शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अण्णांच्या समर्थनार्थ नगरमध्येआत्मक्लेश; गांधींच्या बंगल्याला राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ घालणार घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 13:25 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील सत्याग्रहाच्या समर्थनार्थ बुधवारी भर उन्हात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. तर राळेगणसिद्धीत सरकारी यंत्रणांना गावबंदी करण्यात आली असून, खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानाला दुपारी घेराव घालणार आहेत.

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील सत्याग्रहाच्या समर्थनार्थ बुधवारी भर उन्हात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. तर राळेगणसिद्धीत सरकारी यंत्रणांना गावबंदी करण्यात आली असून, राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानाला दुपारी घेराव घालणार आहेत.अण्णांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. केंद्र सरकारला सत्याग्रहाची पूर्वकल्पना असूनही अण्णांच्या मागण्यांबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी यावेळी केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर उन्हात कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केले. कुठलीही घोषणा नाही, निवेदन नाही हे या सत्याग्रहाचे वैशिष्ट्य होते. कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री अण्णांचे आजोळ असलेल्या निंबळक गावात कॅण्डल मार्च काढला. यास गावातील अबाल वृद्ध, तरुण, लहान मुले यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच सावेडी उपनगरात चौकात सभा घेऊन जनजागृती केली.दरम्यान आज राळेगणसिद्धी येथील ग्रामसभेत सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच गावात एकही सरकारी यंत्रण येऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी राळेगणसिद्धी येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनाही ग्रामस्थांनी गाव सोडण्याची सूचना केली आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDilip Gandhiखा. दिलीप गांधीanna hazareअण्णा हजारे