शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीत जनतेतून होणार सरपंच

By admin | Updated: July 4, 2017 15:07 IST

नगर तालुक्यातील तब्बल ३१ ग्रामपंचायतींची मुदत संपत आल्याने लवकरच त्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

नगर तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीत जनतेतून होणार सरपंचलोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : नगर तालुक्यातील तब्बल ३१ ग्रामपंचायतींची मुदत संपत आल्याने लवकरच त्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली असून दोन टप्प्यात निवडणुकीचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने याचा पहिला प्रयोग यावर्षी नगर तालुक्यातील पाहावयास मिळणार आहे. नगर तालुक्यातील सुमारे ३१ ग्रामपंचायतींची मुदत यावर्षी संपत आहे. ज्या गावांच्या मुदत संपत आहेत त्या गावच्या नावांची यादी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवली आहे. त्यांनी पुढील प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडे या गावांची नावे पाठवली आहेत. दोन टप्प्यात या निवडणुका होण्याची दाट शक्यता असल्याने सप्टेंबर-आॅक्टोबर मध्ये पहिला टप्पा तर नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये दुस-या टप्प्यातील गावांच्या निवडणुका होतील. तालुक्यातील आगडगाव,आठवड, बाबुर्डी बेंद, बारदरी, जखणगाव, कापूरवाडी, खातगाव, कौडगाव, मदडगाव, नागरदेवळे, नांदगाव, नारायणडोहो, नेप्ती, पांगरमल, पिंपळगाव कौडा, पिंपळगाव उज्जेनी, पिंपळगाव लांडगा, राळेगण, रांजणी, रतडगाव, साकत, सारोळा बद्धी, सारोळा कासार, ससेवाडी, शेंडी, सोनेवाडी पिला, सोनेवाडी चास, टाकळी खातगाव, उक्कडगाव, वडगाव तांदळी, वाळकी या गावामध्ये थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. .....