राहुरी : गुहा ग्रामपंचायतीचे सरपंच आब्बास शेख यांचे रविवारी सायंकाळी अपहरण करण्यात आल्याची फिर्याद त्यांचा मुलगा जाकीर शेख यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.आठवड्यापूर्वी गुहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आब्बास शेख यांची निवड झाली होती. शेख हे रविवारी सायंकाळी गुहा येथील शेतामध्ये देखरेख करण्यासाठी मोटारसायकलवरुन गेले होते. त्याचवेळी स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या तिघांनी शेख यांना उचलून गाडीत टाकले व निघून गेले.सोमवारी दिवसभर त्यांचा मुलगा जाकीर व गावकर्यांनी सरपंच शेख यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. सायंकाळी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू करीत आहेत.
सरपंचाचे अपहरण
By admin | Updated: September 8, 2015 17:19 IST