शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अजनूजचा ‘तो’ वाळूसाठा प्रशासनाकडून बंद; अटी-शर्तींचा भंग, यंत्राने होत होता वाळूउपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 15:45 IST

न्यायालयाचा आदेश डावलून, तसेच अटी-शर्तींचा भंग करून अजनूज (ता. श्रीगोंदा) येथे सुरू असलेला वाळूसाठा ‘लोकमत’च्या वृत्तामुळे प्रशासनाने मंगळवारी बंद केला. येथे सक्शन पंपाद्वारे वाळूउपसा सुरू होता.

अहमदनगर : न्यायालयाचा आदेश डावलून, तसेच अटी-शर्तींचा भंग करून अजनूज (ता. श्रीगोंदा) येथे सुरू असलेला वाळूसाठा ‘लोकमत’च्या वृत्तामुळे प्रशासनाने मंगळवारी बंद केला. येथे सक्शन पंपाद्वारे वाळूउपसा सुरू होता.जिल्ह्यात तीन ठिकाणच्या वाळूसाठ्यांचे लिलाव झाले आहेत. यात अजनूज (ता. श्रीगोंदा) येथे ६ हजार ३६० ब्रासचा ठेका पुण्याच्या एका ठेकेदाराने घेतला आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार सक्शन पंपाद्वारे वाळूउपसा करता येत नाही, तसेच उपशासाठी यंत्रही वापरता येत नाही. मात्र या नियमाला तिलांजली देत अजनूज येथे राजरोसपणे सक्शन मशीन व जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा होत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते.या वृत्ताची दखल घेत मंगळवारी सकाळी श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी मंडलाधिकारी, तलाठी यांचे पथक अजनूज येथे पाठवून या ठेक्यावरील वाळूउपसा बंद करण्याचे आदेश दिले. याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवून वाळूउपसा करताना अटी व शर्तींचा भंग झाला आहे का, याची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई होणार असल्याचे माळी म्हणाले. दरम्यान, अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनीही असा नियमबाह्य उपसा होत असेल तर संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे म्हटले होते. आता प्रशासन या प्रकरणी ठेकेदारावर काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.दरम्यान जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार श्रीगोंद्याचे प्रांताधिकारी, तहसीलदार व जिल्हा खनिकर्म अधिकारी हे मंगळवारी सायंकाळी अजनुज येथील वाळू साठ्यांची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा