शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या बाबतीत संगमनेर नगरपरिषद स्वयंपूर्ण;  वीजबिल मुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 15:27 IST

संगमनेर नगरपरिषदेच्या प्रशासकीय भवनाच्या मुख्य इमारतीवर उभारलेला २५ किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प पाच महिन्यांपूर्वी कार्यान्वीत करण्यात आला. त्यामुळे विजेच्या बाबतीत संगमनेर नगरपरिषद स्वयंपूर्ण बनली आहे. २० लाख रुपये खर्चून उभारलेल्या ‘आॅन ग्रीड सोलर सिस्टीम’मुळे नगरपरिषदेची वाटचाल आता वीज बिल मुक्तीकडे सुरू आहे.

शेखर पानसरे  /  संगमनेर : संगमनेर नगरपरिषदेच्या प्रशासकीय भवनाच्या मुख्य इमारतीवर उभारलेला २५ किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प पाच महिन्यांपूर्वी कार्यान्वीत करण्यात आला. त्यामुळे विजेच्या बाबतीत संगमनेर नगरपरिषद स्वयंपूर्ण बनली आहे. २० लाख रुपये खर्चून उभारलेल्या ‘आॅन ग्रीड सोलर सिस्टीम’मुळे नगरपरिषदेची वाटचाल आता वीज बिल मुक्तीकडे सुरू आहे.  नगरपरिषदेच्या प्रशासकीय भवनाचे वार्षिक वीज देयक साधारण सहा लाख रुपयेआहे. हा खर्च कमी करण्यासाठी नगरपरिषदेने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. सर्वसाधारण सभेत हा विषय घेत त्यावर चर्चा झाली. अंदाजपत्रकात नगरपरिषदेच्या निधीतून २४ लाख ६९ हजार रूपयांची तरतूद या प्रकल्पासाठी करण्यात आली होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात २५ किलोवॅट क्षमतेच्या ‘आॅन ग्रीड सोलर सिस्टीम’चे काम पूर्ण झाले. यावर्षी ६ जानेवारीला कार्यान्वीत झालेल्या प्रकल्पासाठी अंदाजपत्रकापेक्षा पाच लाख रूपयांची बचत झाली आहे.  या प्रकल्पाद्वारे दररोज साधारण १०० ते १३० युनिट इतकी वीज निर्मिती होते. सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत करण्यापूर्वी जानेवारी ते मे (२०१९) या पाच महिन्यांच्या कालावधीत नगरपरिषदेत १८ हजार १६९ युनिटचा विजेचा वापर झाला होता. त्यापोटी महावितरणला २ लाख ४१ हजार ५१७ इतका वीज बिल भरणा करण्यात आला. मात्र, सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत झाल्यानंतर जानेवारी ते मार्च (२०२०) या तीन महिन्यात केवळ २ हजार ५२३ रुपये वीज बिल आले आहे.

संगमनेर नगरपरिषदेत सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत व्हावा, अशी काही वर्षांपासूनची इच्छा होती. त्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. त्यावर मात करीत हा प्रकल्प पूर्ण केला. भविष्यात संगमनेर शहर ‘सोलर सिटी’ करण्याचा मानस असून त्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली आहे, असे नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी सांगितले.

 सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत झाल्यानंतर नगरपरिषदेत विजेचा वापर साधारण नव्वद टक्यापर्यंत कमी झाला आहे. याचा आर्थिक फायदा होत असून भविष्यात हा प्रकल्प फायदेशीर ठरणारा आहे, असे संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी सांगितले.   

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर