शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संदीप वराळ हत्याकांड : तपासी अधिका-यावर गुन्हा दाखल करा - न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:08 IST

पारनेर तालुक्यातील निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ हत्येप्रकरणी तपासी अधिकारी असलेले पोलीस उपाधीक्षक आनंद भोईटे यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ हत्येप्रकरणी पोलिसांनी बनावट साक्षीदार दाखविल्याचे सिद्ध झाल्याने औरंगाबाद खंडपीठाने तत्कालीन तपासी अधिकारी असलेले पोलीस उपाधीक्षक आनंद भोईटे यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.न्यायमूर्ती के. के. सोनावणे व टी.व्ही. नलावडे यांनी सोमवारी (दि.२२) हा निकाल दिला. याप्रकरणी निघोज येथील बबन किसन कवाद व मुक्तार शामीर इनामदार यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती.निघोज येथे २१ जानेवारी २०१७ रोजी संदीप वराळ यांची रसाळ टोळीने भरचौकात हत्या केली होती. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एकूण ३३ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात बबन कवाद व मुक्तार इनामदार यांचीही नावे होती. या हत्याकांडाचा तत्कालीन उपविभागीयअधिकारी आनंद भोईटे यांनी तपास केला होता.या हत्याकांडाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, तपासात पोलिसांनी दाखविलेले खोटे साक्षीदार व बनावट कागदपत्रांची तपासणी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशा मागणीची याचिका कवाद व इनामदार यांनी अ‍ॅड.एन.एस. घाणेकर यांच्यामार्फत खंडपीठात दाखल केली होती. न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली तेव्हा तपासातील सत्य समोर आले. हत्याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी दाखविलेल्या तिघा साक्षीदारांपैकी एक जण हत्याकांडाच्या आधीच मयत झाला होता. दुसरा परदेशात होता. याबाबत न्यायालयाने पोलीस अधीक्षकांकडून चौकशी अहवाल मागितला होता.हा अहवाल न्यायालयासमोर आला. तेव्हा सदरचे जबाब नोंदविताना संगणकावर नजरचुकीने कॉपीपेस्ट झाल्याचा दावा पोलिसांच्यावतीने करण्यात आला. तसेच पोलिसांकडून तपासात चुका झाल्याचेही कबूल केले.याप्रकरणी तपासी अधिकारी आनंद भोईटे यांची या प्रकरणी विभागीय चौकशी आदेशीत केल्याचे तर दुसरे दोषी आढळलेले त्यांचे मदतनीस पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पांडे यांची एक वर्षांकरता पगारवाढ थांबवली असल्याचे म्हणणे न्यायालयात सादर करण्यात आले होते. न्यायालयाने मात्र हा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही. या तपासात तपासी अधिकारी भोईटे यांनी भादंवि कलम १६७ अन्वये शिक्षेस पात्र गुन्हा केल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने भोईटे यांच्यावर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करावा, असे आदेश दिले आहेत.राज्यभर गाजले होते हत्याकांडनिघोज येथील संदीप वराळ हत्याकांड राज्यभर गाजले होते. या गुन्ह्यातील सराईत आरोपींवर मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. साक्षीदारासंदर्भातील बनावट कागदपत्र केल्याचे प्रकरण समोर आल्याने हे हत्याकांड पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. दरम्यान संदीप वराळ हत्याप्रकरणाचा पोलिसांनी चुकीचा तपास केला असून या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी याचिकाकर्ते बबन कवाद यांनी केली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीसParnerपारनेर