शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपसा प्रकरण : जिल्हाधिका-यांसह नऊ महसूल अधिका-यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 19:45 IST

वाळू लिलावासाठी नियमबाह्य पद्धतीने निविदा काढून वाळू तस्करीला साथ दिली या कारणावरुन नागरिकांनी एकत्र येत महसूल सचिव व जिल्हाधिका-यांसह नऊ अधिकाºयांविरोधात येथील न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यात अधिकारी व ठेकेदारांना म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.

अहमदनगर: वाळू लिलावासाठी नियमबाह्य पद्धतीने निविदा काढून वाळू तस्करीला साथ दिली या कारणावरुन नागरिकांनी एकत्र येत महसूल सचिव व जिल्हाधिका-यांसह नऊ अधिका-यांविरोधात येथील न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यात अधिकारी व ठेकेदारांना म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.मार्च महिन्यात येथील अप्पर जिल्हाधिका-यांनी १६ वाळू ठेक्यांचे लिलाव करताना नियम पाळलेले नाहीत, ही बाब ‘लोकमत’ने उजेडात आणली होती. वाळू ठेक्यांच्या ठिकाणी ठेकेदार जेसीबी, पोकलेन व ढंपरसारखी मशिनरी लावून बेसुमार वाळू उपसा करत आहेत व तक्रारी होऊनही महसूल अधिकारी कारवाई करत नसल्याचेही चित्र दिसले. याप्रकरणी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. शाम आसावा, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस व शेतकरी संपत जाधव यांनी एकत्रित येत दिवाणी प्रक्रिया संहितेनुसार ‘प्रातिनिधीक दावा’ दाखल केला आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयात पर्यावरणविषयक कायद्यांचा अभ्यास असणारे अ‍ॅड. असीम सरोदे बाजू मांडत आहेत.याप्रकरणात वाळू ठेक्यांना अंतरिम स्थगिती देण्यात यावी अशी मागणी शुक्रवारी न्यायालयात अ‍ॅड. सरोदे यांनी केली. मात्र या दाव्यावर प्रतिवादींचे म्हणणे विचारात घेऊन अंतरिम आदेशापेक्षा मूळ दावाच तत्काळ निकाली काढण्याच्या दृष्टीने मंगळवारी सुनावणी घेण्यात येईल, असे सहावे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश पी.पी. मोदी यांनी सांगितले. वाळू ठेक्यांना स्थगिती देऊन अनियमिततेची जबाबदारी निश्चित व्हावी ही याचिकाकर्त्यांची मागणी आहे.प्रातिनिधीक दावा म्हणजे काय?जनहिताच्या मुद्यावर दोन किंवा जास्त लोक एकत्र येऊन ते स्थानिक न्यायालयाय प्रातिनिधीक दिवाणी दावा (रिप्रेझेन्टेटिव्ह सूट) दाखल करु शकतात. दिवाणी प्रक्रिया संहितेत आॅर्डर १, रुल ८ नुसार हा दावा दाखल करता येतो. बºयाचदा नागरिकांना एखाद्या सार्वजनिक अन्यायाविरोधात थेट उच्च न्यायालयात दावा दाखल करणे शक्य होत नाही. अशावेळी या दाव्याचा आधार घेता येतो, असे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.राज्यमंत्री राठोड यांच्या आदेशालाही स्थगितीमहसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी नगर जिल्ह्यातील हनुमंतगाव येथील वीस हजार ब्रासच्या वाळू ठेक्याला मुदतवाढ देण्यासंदर्भात काढलेले शुद्धिपत्रक नियमबाह्य आहे, हे प्रकरणही ‘लोकमत’ने उघडकीस आणले आहे. राठोड यांच्या आदेशाला व सदर वाळू ठेक्याला औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. राज्यमंत्र्यांनाही या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय