शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

जवानांना सलाम! लग्नमंडपामधून थेट निघाले रणांगणात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 04:40 IST

ताबडतोब ड्युटीवर हजर व्हा, असा संदेश जवानास मिळाला.

तुषार वांढेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर : तालुक्यातील नारायणडोहो येथील जवान मनीष साठे याचे लग्न पार पडले. अंगाला हळद, हातावर मेहंदी असताना, त्याने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कर्तव्यावर हजेरी लावली. निरोप देताना साठे कुटुंबाची देशभक्ती  गावाने अनुभवली.  

नारायणडोहो येथील रावसाहेब मोहन साठे यांचा मुलगा मनीष हा दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात रुजू झाला. सध्या तो ओडिशा येथे कार्यरत आहे. इमामपूर येथील अशोक रामदास मोकाटे यांची कन्या नमिता हिच्याशी मनीषचा विवाह ठरला. त्यामुळे मनीष यांनी लग्नासाठी काही दिवसांची रजा घेतली आणि ते गावी आले होते.  

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संदेश आला; हळदीच्या अंगाने जवान सीमेवर गेला

अशोक मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, करंजी (जि. अहिल्यानगर) : लग्न होऊन अवघे दोन दिवस उलटले नाहीत, तोच ड्युटीवर हजर होण्याचा संदेश आला. अर्धे अंग हळदीचे असतानाच कान्होबावाडी (करंजी, ता. पाथर्डी) येथील जवान भारत मातेच्या रक्षणासाठी सोमवारी पंजाबकडे रवाना झाला. त्याला निरोप देताना पत्नी,  नातेवाईक भावुक झाले. कान्होबावाडी येथील महेश विठ्ठल लोहकरे हा लष्कराच्या मराठा फाइव्ह लाइट इन्फंट्रीमध्ये आहे.लग्न होऊन अवघे दोनच दिवस झाले 

महेश लोहकरे हे लग्नासाठी सुटीवर आले होते. त्यांचा स्वरूपा हिच्याशी शुक्रवारी (दि. ९) विवाह झाला. लग्न होऊन अवघे दोनच दिवस झाले. अंगाची हळददेखील फिटली नव्हती, तोच ताबडतोब ड्युटीवर हजर व्हा, असा संदेश जवानास मिळाला.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान